चंद्रपूरात दीक्षाभूमीवर ११, १२ व १३ एप्रिलला प्रबोधन पर्वाचे भव्य आयोजन (A grand 'Prabodhan Parva' (Enlightenment Festival) has been organized at Dikshabhumi in Chandrapur on April 11, 12, and 13.)
फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा जागर व्याख्यानमालेतून सामाजिक प्रबोधन होणार
चंद्रपूर :- सामाजिक समता, विचारजागृती आणि परिवर्तनाचा संदेश देणारे प्रबोधन पर्व २०२६ चंद्रपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असून समाजात विचारांचे प्रबोधन घडवून सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा उद्देश आहे. ११ एप्रिल रोजी ‘शिक्षण ते सामाजिक क्रांती : महात्मा फुले यांचे योगदान व आजची गरज’ या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्ष म्हणून डॉ. मिलिंद कांबळे अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर उपस्थित राहतील. प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. प्रतिमा परदेशी (पुणे) व गणेश हलकारे सहभागी होणार आहेत. १२ एप्रिल रोजी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय : छत्रपती शाहूजी महाराजांचा सामाजिक वारसा आणि वर्तमान’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या सत्राचे अध्यक्ष डी. राजेश जनबंधू अध्यक्ष, बाणाई चंद्रपूर असतील. प्रमुख व्याख्याते म्हणून इतिहास संशोधक हो. विक्रम कदम (सातारा) व प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ. विद्या रायकवार उपस्थित राहणार आहेत. १३ एप्रिल रोजी भारताच्या नवयुगाचे निर्माते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर विचारमंथन होणार असून अध्यक्ष म्हणून अरुण घोटेकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर उपस्थित राहतील. प्रमुख व्याख्याते म्हणून अभिनेते व व्याख्याते किरण माने (मुंबई) तसेच फुले-शाहू-आंबेडकरी विचारवंत वैशाली डोळस सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय कार्यक्रम ११, १२ व १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या