धक्कादायक ! बल्लारपुरात 26 वर्षीय तरुणाची हत्या ! 5 युवकांनी मिळून हत्या केल्याची माहिती, हत्येनंतर 5 ही युवकांनी केले आत्मसमर्पण (Shocking ! 26-year-old youth killed in Ballarpur! Information that 5 youths were killed together, 5 youths surrendered after the murder)

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! बल्लारपुरात 26 वर्षीय तरुणाची हत्या ! 5 युवकांनी मिळून हत्या केल्याची माहिती, हत्येनंतर 5 ही युवकांनी केले आत्मसमर्पण (Shocking ! 26-year-old youth killed in Ballarpur!  Information that 5 youths were killed together, 5 youths surrendered after the murder)

बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील क्रमांक 2 चे शहर म्हणून बल्लारपूर शहराची ओळख तसेही अनेक बाबतीत बल्लारपूर शहर राज्यभरात ओळखलं जात बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानक ई बाबतीत विशेष म्हणजे बल्लारपूर शहर मिनी इंडिया म्हणून ओळखलं जात   या शहरात विविध जाती धर्म व पंथाचे नागरिक वास्तव्य करतांना दिसतात. 

       बल्लारपूर शहर पुन्हा एका हत्येने हादरले असून 5 युवकांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात अधिक माहितीनुसार सदर घटना आज पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान घडली असून बल्लारपूर शहरातील स्थानिक रवींद्र नगर वॉर्ड कारवा रोड येथे वास्तव्यास असणारे दिपक कैथवास वय - 26 वर्ष यांची 5 तरुणांनी मिळून हत्या केल्याची माहिती आहे हत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी सदर घटनेनंतर या 5 ही तरुणांनी बल्लारपूर पोलिसांकडे आत्मसमर्पण केले असल्याची माहिती आहे. दिपक कैथवास यांच्या विरोधात बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती असून तो नेहमी कुणासोबतही वाद घालत असून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. सूत्रांच्या माहिती नुसार आरोपी युवकांसोबतही मृतकाने वाद घालून मारहाण केल्याचे वृत्त आहे. त्या वादाच्या कारणावरून तर सूळ घेण्याच्या उद्देशाने तर संबंधित युवकांनी हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आरोपीनी रॉड व काठ्यांनी प्रहार केले असून या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी पोहोचली असून मृतदेह उत्तरीय तपासनी साठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे असून या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)