धक्कादायक ! बल्लारपूरात दोन महिलावर अत्याचार झाल्याची घटना, अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, 2 आरोपी अटकेत, पोलीस तपास सुरु (Shocking! Two women were raped in Ballarpur, minor committed suicide by hanging, 2 accused arrested, police investigation started)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! बल्लारपूरात दोन महिलावर अत्याचार झाल्याची घटना, अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, 2 आरोपी अटकेत, पोलीस तपास सुरु (Shocking! Two women were raped in Ballarpur, minor committed suicide by hanging, 2 accused arrested, police investigation started)


बल्लारपूर :- महिलांच्या सुरक्षेकरिता अनेक उपाय योजना करण्याचा तसेच स्त्री वर होणाऱ्या अत्याचार संदर्भात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना अनेक आंदोलन करीत असतांना सुध्दा दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनात सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे. अशाच प्रकारच्या घटना बल्लारपूर शहरात उघडकीस आल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून कळत आहे. या संदर्भातील अधिक माहितीनुसार बल्लारपूर शहरातील फुलसिंग नाईक वॉर्ड व शिवनगर वॉर्ड येथे 2 तरुणीचा विनयभंग व अत्याचार झाल्याची माहिती असून शिवनगर वॉर्ड येथील एका 35 वर्षीय मतिमंद तरुणीवर चंदू बालू भुक्या वय 58 वर्ष या परिचित असलेल्या व्यक्तींनीच अत्याचार केल्याची माहिती मिळत असून सदर घटना सकाळी 11:00 वाजताच्या दरम्यान घडली या घटनेच्या वेळी सदर महिलेची आई ही हॉटेल मध्ये कामाला गेली असून ती परत आल्यावर ही घटना उघडकीस आली या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

 
       तर दुसऱ्या एका घटनेत फुलसिंग वार्ड येथील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा प्रेमप्रकरणातून विनयभंग झाल्याची घटना असून सदर तरुणीची  लैंगिक शोषण झाले असून या प्रकरणात शिवम दिनेश दुपारे वय - 20 रा मौलाना आजाद वार्ड बल्लारपूर या प्रकरणातील आरोपीना रात्री अटक केली असून तपास सुरु असतांनाच आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली पोस्को 4(1) व बिएनएस 2023 64(1) ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस निरीक्षक सुनिल वि. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम व गोविंद चाटे करीत आहे विशेष म्हणजे या घटने मुळे पालक वर्गात भीतीदायक वातावरण असून .सदर अत्याचाराचे प्रकरण अंत्यन्त गंभीर स्वरूपाचे असून या दोन्ही प्रकरणात 2 आरोपीना अटक करण्यात आली असून या घटनेतील पीडित अल्पवयीन मुलीची आत्महत्या ही दुःखद असून या घटनेतील आरोपी व ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली त्या लॉज च्या व्यवस्थापक व संचालकाला लवकरच चौकशी करिता ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)