दिव्यांग असलेले वर निलेश व वधू पुष्पा यांचे अनुकरणीय पाऊल, विविध सामाजिक उपक्रमांनी विवाह सोहळा संपन्न (Exemplary steps taken by disabled groom Nilesh and bride Pushpa, wedding ceremony concluded with various social activities)

Vidyanshnewslive
By -
0
दिव्यांग असलेले वर निलेश व वधू पुष्पा यांचे अनुकरणीय पाऊल, विविध सामाजिक उपक्रमांनी विवाह सोहळा संपन्न (Exemplary steps taken by disabled groom Nilesh and bride Pushpa, wedding ceremony concluded with various social activities)


चंद्रपूर :- विवाह सोहळा म्हटले की प्रचंड खर्च, झगमगाठ, देखावा, जल्लोष परंतु जीवनातील महत्त्वपूर्ण अशा विवाह सोहळ्याला सुद्धा सामाजिक संवेदनशील तेची जोड देऊन एक अनुकरणीय असा मोलाचा संदेश काहीजण देतात. असाच एक आगळावेगळा विवाह सोहळा स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात पार पडला. ज्यामध्ये दिव्यांग कल्याण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणारे निलेश पाझारे यांचा विवाह पुष्पा सावसागडे यांचेशी नोंदणी पद्धतीने संपन्न झाल्यावर विवाहाच्या सर्वच पारंपारिक पद्धतीना फाटा देत दिव्यांगांना स्वयंचलित वाहन, अंध स्मार्ट काठी, श्रवण यंत्र आणि कुबडीचे वाटप करण्यात आले तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील दिव्यांग विभागाला व्हीलचेअर सुद्धा भेट देण्यात आले सोबतच विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना दिव्यांग, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्याचा उल्लेखनीय उपक्रम सुद्धा घेण्यात आला ज्यामध्ये समाजसेवा अधीक्षक भास्कर झळके आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेची सविस्तर माहिती दिली. वर निलेश स्वतः दिव्यांग असून ते मागील अनेक वर्षांपासून दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच विविध सामाजिक चळवळीत सुद्धा ते सक्रिय आहेत. सदर विवाह सोहळ्याने एक सकारात्मक असा अनुकरणीय सामाजिक संदेश समाजाला दिला असून सर्वत्र पाझारे व सावसाकडे कुटुंबाचे कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्याला चंद्रपुरातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)