बल्लारपूर नगर परिषद निवडणूक निकाल काँग्रेस १२, भाजपचे ३, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ३ उमेदवार विजयी (Ballarpur Municipal Council election results: Congress 12, BJP 3, and Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) group 3 candidates have won.)
बल्लारपूर नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या सौ अल्का ताई वाढई यांचा 214 मतांनी विजय
बल्लारपूर :- बल्लारपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत ९ प्रभागांमध्ये झालेल्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाने स्पष्ट वर्चस्व सिद्ध केले आहे. मतमोजणीअंती काँग्रेसचे १२ उमेदवार विजयी झाले असून भाजपचे ३, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ३ उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अल्का अनिल वाढई आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
प्रभाग क्रमांक १ मधून लखनसिंह चंदेल (भाजपा) व छाया मडावी (काँग्रेस) विजयी झाले. प्रभाग क्रमांक २ मधून मोहित डांगोरे (भाजपा) व वैष्णवी जुमडे (काँग्रेस) यांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक ३ मधून पवन मेश्राम व शिल्पा चुटे (दोन्ही काँग्रेस) निवडून आले. प्रभाग क्रमांक ४ मधून महेंद्र ढोके (भाजपा) व अमकुबाई भिक्या (काँग्रेस) विजयी ठरले. प्रभाग क्रमांक ५ मधून सिक्की यादव व रंजिता बिरे (दोन्ही शिवसेना) यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ६ मधून देवेंद्र आर्य व मोना धानोरकर (दोन्ही काँग्रेस) निवडून आले. प्रभाग क्रमांक ७ मधून अब्दुल करीम व वैशाली हुमने (दोन्ही काँग्रेस) विजयी झाले. प्रभाग क्रमांक ८ मधून मुकद्दर शेख (काँग्रेस) व प्रियंका भारत थुलकर(काँग्रेस) यांनी यश संपादन केले. प्रभाग क्रमांक ९ मधून मनोज बेले (शिवसेना) व मेघा भाले (काँग्रेस) निवडून आले.
तर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या सौ अल्का अनिल वाढई या भारतीय जनता पक्षाच्या सौ रेणुकाताई दुधे यांच्यावर मतमोजणीच्या ७ व्या फेरी अखेर आघाडी घेतली असून निकालाच्या दृष्टीने चूरस वाढत चाललेली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार बल्लारपूर नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या सौ अल्का ताई वाढई यांचा 214 मतांनी विजय मिळविला असल्याचे वृत्त आहे.
(बातमी अपडेट होत आहे.....)
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या