बल्लारपूरच्या पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांची रामनगर पोलीस स्टेशनला बदली तर रामनगरचे सुनिल गाडे बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती Ballarpur Police Inspector Asifaraja Shaikh transferred to Ramnagar Police Station and Ramnagar Sunil Gade posted as Ballarpur Police Inspector.
बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक व उप निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातर्गत बदल्या करण्यात आल्या असून दिनांक 5 ऑगस्ट 2024 च्या आदेशानुसार नव्या ठिकाणी रुजू होण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे यानुसार बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे ५ फेब्रुवारी रुजू झाले होते. त्यांनी त्यांच्या ६ महिन्याच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर वचक निर्माण केले होते. त्यांच्या बदली ने नागरिकात रोष व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख कर्मचाऱ्यांत लोकप्रिय होते. बल्लारपूर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांची आज बदली झाली आहे.
बल्लारपूर शहरातील पोलीस निरीक्षक म्हणून ख्याती प्राप्त केली होती विशेष म्हणजे मालू वस्त्र भंडार व पेट्रोल बॉम्ब प्रकरणातील आरोपीचा छळा लावण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती आसिफराजा शेख यांची रामनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर रामनगर येथील पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांची बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे यासंबंधी चे पत्रक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जारी झाले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या