बल्लारपूरात विविध घटनेत 2 व्यक्तींच्या आत्महत्या, एकाची धावत्या टँकर समोर तर दुसरा गळफास घेऊन आत्महत्या (In Ballarpur, two individuals committed suicide in separate incidents: one jumped in front of a moving tanker, while the other took his own life by hanging.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात विविध घटनेत 2 व्यक्तींच्या आत्महत्या, एकाची धावत्या टँकर समोर तर दुसरा गळफास घेऊन आत्महत्या (In Ballarpur, two individuals committed suicide in separate incidents: one jumped in front of a moving tanker, while the other took his own life by hanging.)

बल्लारपूर :- शहरातील कलाकेंद्र फोटो स्टुडिओसमोर रविवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत एका अज्ञात युवकाचा धावत्या डिझेल टँकरसमोर येऊन मृत्यू झाला. ही घटना दुपारी सुमारे ३.५० वाजण्याच्या सुमारास घडली असून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे ३५ वर्षीय युवक अचानक धावत येत भरधाव वेगात असलेल्या डिझेल टँकर क्रं. एमएच ३४ बीजी ६२६० समोर आला. चालकाला काही समजण्याआधीच टँकरची जोरदार धडक बसून युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदर टँकर ताडली येथून डिझेल भरून राजुरा तालुक्यातील रामपूर येथील गौरव पेट्रोल पंपाकडे जात होता. टँकर चालक शेषराव बाजीराव कुळमेथे (वय ४७), रा. चीचाळा, ता. चंद्रपूर यांनी तत्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे हजर होत घटनेची माहिती दिली. मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून तो शहरातील बांधकामावर काम करणारा मजूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून ही घटना अपघात की आत्महत्या याबाबत पुढील तपास बल्लारपूर पोलीस सुरू आहे. 
            बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बामणी गावात एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, महादेव काशीनाथ तीतरे (वय ५१ वर्ष) यांनी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला. मृत व्यक्तीस दारूचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीनाथ गिराम व पोलीस अंमलदार महेश कुकुडकर करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)