बामणी-राजुरा मार्गांवर भीषण अपघात, माय लेकीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू (Terrible accident on Bamani-Rajura roads, mother and daughter died on the spot)

Vidyanshnewslive
By -
0
बामणी-राजुरा मार्गांवर भीषण अपघात, माय लेकीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू (Terrible accident on Bamani-Rajura roads, mother and daughter died on the spot)


बल्लारपूर :- बामणी-राजुरा मार्गांवर राजुरा पुलाच्या पूर्वी जलाराम मंदिर जवळ एका ट्रकने दुचाकी वर स्वार एका महिला व 8 वर्षीय मुलीला चिरडले या भीषण अपघातात राजुरा येथील महिला व मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला सदर महिला आपल्या माहेरी आईला भेटायला चंद्रपूर ला जात असताना वर्धा नदी जवळ या ट्रक ने स्कुटी ला धडक दिल्याने दोन्ही माय लेकीचा घटनास्थळी मृत्यू झाला. मृतकाचे नाव ज्योती बंडू रागीट (३८), सेजल बंडू रागीट (८) रा. पेट वॉर्ड नेहरू चौक राजुरा असे असून सदर घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. राजुरा येथील पेट वॉर्ड निवासी बंडू रागीट यांची पत्नी ज्योती बंडू रागीट व लहान मुलगी सेजल बंडू रागीट हे दोघे माय लेकी स्कुटी क्रं. एमएच ३४ बीएन ५ हजार ५३८ ने चंद्रपूर ला आपल्या आई कडे जात होती. दरम्यान वर्धा नदी जवळील मंदिर जवळ ट्रक क्रं. एमएच ३४ बीझेड ७ हजार ६९९ ने स्कुटी ला धडक दिली. त्यात ज्योती व सेजल खाली पडून ट्रक चा चाकाखाली आले. त्यात ज्योतीचा डोक्यावरून तर सेजल चा पोटावरून ट्रक गेला. त्यात दोघांचा जागीच करुण अंत झाला. घटनेची माहिती बल्लारपूर पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोअं. नरेंद्र वाकडे करीत आहे. सेजल रागीट ही इन्फंट जेसस इंग्लिश स्कूल राजुरा येथे ६ वी मध्ये शिकत होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)