पार्टीला जाने जिवावर बेतले, बुटीबोरी जवळ रस्ते अपघातात न्यायाधीशाचा व वकिलाचा मुलगा ठार.... (Party Outing Proves Fatal: Judge's and Lawyer's Sons Killed in Road Accident Near Butibori.)

Vidyanshnewslive
By -
0
पार्टीला जाने जिवावर बेतले, बुटीबोरी जवळ रस्ते अपघातात न्यायाधीशाचा व वकिलाचा मुलगा ठार.... (Party Outing Proves Fatal: Judge's and Lawyer's Sons Killed in Road Accident Near Butibori.)

नागपूर :- पार्टीतून परत येताना महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या बी.ए. एल.एल.बी. ऑनर्स न्यायनिर्णय आणि न्यायदान या अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्रात शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीवरून पडून मृत्यू झाला. आर्यन रवींद्र सोनटक्के (वय १९, रा. दत्त चौक, यवतमाळ) आणि सक्षम विनोद बनसोड (वय २०, रा. बेसा. मुळ रा. चंद्रपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन हा यवतमाळ येथील प्रसिद्ध वकील रवींद्र सोनटक्के यांचा मुलगा असून सक्षम हा चंद्रपूर येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीशाचा मुलगा आहे. ते २०१७ मध्ये जिल्हा न्यायाधीश होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारीच आर्यन आणि सक्षम हे दोघेही पार्टी करण्यासाठी दुचाकीने (क्रमांक एमएच ४९ सीआर १४५७ ) वसतीगृहातून निघाले. रात्री पार्टी झाल्यावर ते वसतिगृहाकडे परत येत होते. ही घटना बुधवारी (ता.१५) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बुटीबोरी पोलिस हद्दीतील वारंगा टोली परिसरात घडली. 
          विद्यापीठापासून चारशे मीटर अंतरावर असलेल्या वळणावर त्यांची गाडी वेगात असल्याने उसळी आणि दोघेही रस्त्या शेजारी असलेल्या मोठ्या खड्ड्यात पडले. दगडावर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीचा अंधार असल्याने कुणालाही ते आढळले नाही. गुरुवारी सकाळी स्थानिकांना ते पडलेल दिसल्याने त्यांनी याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला दिली. विद्यापीठाने बुटीबोरी पोलिसांना कळविले. लगेच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्समध्ये पाठविले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. आर्यन आणि सक्षम यांचा अपघात झाल्यावर ते जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी रात्रभर पडून होते. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, सायंकाळीच या रस्त्यावरून वाहतूक बंद होत असल्याने तो निर्जन होतो. अपघात झाल्यावर तिथे अंधार असल्याने त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)