बल्लारपूर :- बल्लारपूर शहर हे औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे शहर असून चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाते याशिवाय बल्लारपूर व आसपासच्या परिसरातील अनेक उद्योगामुळं वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. तसेच बल्लारपूर शहरात वाढत्या अतिक्रमण ही निरपराध नागरिकांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरत आहे. बल्लारपूर शहरात मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक दुकानदारांनी रस्त्यालगत दुकाने व साहित्य मांडल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मागील काही दिवसापूर्वी बल्लारपूर तहसील कार्यालय पार पडलेल्या जनता दरबार येथे पत्रकार बांधवानी बल्लारपूरातील अतिक्रमण व अनियंत्रित वाहतुकी संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असतांना बल्लारपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ग्रामीण रुग्णालय समोर आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास ट्रकच्या धडकेत एका निरपराध व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले.
या संदर्भात अधिक माहितीनुसार मृतकाचे नाव श्रीराम मंग्या जाटोत (५५) रा. फुलसिंग नाईक वॉर्ड, बल्लारपूर असे असून ते चंद्रपूर एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. ते घरगुती साहित्य आणण्यासाठी स्कूटी क्रमांक एमएच ३४ वाय ७०४१ ने जुना बसस्टँडकडे जात असताना ग्रामीण रुग्णालयाजवळ मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३४ बीझेड ५८९७ ने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात श्रीराम जाटोत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालक संतोष कृष्णकुमार टंडन (२७), रा. सिंदोला, ता. वणी, जि. यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित ट्रक जेएसटी कंपनीचा असून तो पेपर मिलमधील राखड वाहून नेले जात होते. विशेष म्हणजे नगर परिषद चौकात ट्राफिक सिग्नल ही शोभेची वस्तू ठरली असून जवळपास २ वर्ष झाली ते वाहतूक दिवे बंद अवस्थेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे व पोलीस अंमलदार नरेंद्र वाकडे करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या