अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या : या घटनेचा मास्टर माईंड कोण ? पोलीस तपासात होईल उघड

Vidyanshnewslive
By -
0

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या : या घटनेचा मास्टर माईंड कोण ? पोलीस तपासात होईल उघड

कोरपना :- अनैतिक संबंधातून पत्नीनेच पतीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघड झाली असून पत्नी विरोधात पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,परंतु या हत्ये प्रकरणात मास्टर माईंड कोण? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे,सदर घटना ही कोरपन्यापासून २ कि,मी अंतरावर असलेल्या धोपटाळा (पारधी गुडा) येथे दि.१६ मार्च २०२२ रोजी रात्री ११:३०वाजताच्या दरम्यान घडली कोरपना धोपटाळा (पारधी गुडा) येथील रहिवासी रमेश परमदास नन्नावरे (३७) याची आपल्या पत्नीनेच गळा आवळून हत्या केली, आरोपी सुरेखा हिचे अश्विन नन्नावरे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे बोलल्या जाते,अश्विन आणि सुरेखा हे आठ महिने गायब होते, ते पळून गेले होते, एक महिन्यांपूर्वीच सुरेखा ही मृतक रमेश यांच्या कडे राहायला आली होती ,परंतु पळून नेण्यात व दोघांना सहकार्ये करण्यात राऊत याचा मोठा हात होता, असा आरोप मृतक रमेशच्या लहान भावाने केला आहे, विशेष म्हणजे ज्या दिवशी सुरेखाने रमेशचा गळा आवळून हत्या केली त्यावेळी अश्विन हा गावालगत असलेल्या शेतात रात्रभर एकटाच दडून बसला होता, व तो दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास गावात आला, त्यामुळे अजूनच संशय बळावला होता, सदर बाब ही काही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितली परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले, हत्येच्या दिवशी अश्विन रात्रभर शेतात काय करत होता? त्याला कोणी पाठविले? राऊत याचा फोन नॉट रीचेबल कसा येत होता, हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत, पत्नी सुरेखा हिच्यावर ३०२चा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)