धक्कादायक ! विसापुर टोलनाक्यावर टोल वाचविण्याच्या प्रयत्नातून कर्मचाऱ्याचा अंगावरून वाहन नेले (Shocking ! An employee was run over by a vehicle at Visapur toll plaza in an attempt to save toll.)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! विसापुर टोलनाक्यावर टोल वाचविण्याच्या प्रयत्नातून कर्मचाऱ्याचा अंगावरून वाहन नेले (Shocking ! An employee was run over by a vehicle at Visapur toll plaza in an attempt to save toll.)


बल्लारपूर :- विसापुर टोलनाका येथे टोल वाचविण्याच्या प्रयत्नातून टोल नाका कर्मचाऱ्याचा अंगावरून गाडी नेले असून टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला. संजय अरुण वांढरे वय २७ वर्षे रा. गांधी वार्ड बल्लारपूर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज रात्री १२.४० बल्लारपूर वरून चंद्रपूर कडे माल घेऊन जाणारी टाटा एस क्रं. एमएच ३४ बीझेड ८८६९ वाहन चा चालक टोलनाका वाचविण्याकरीता टोल फ्री लेन वरून जात होता.


          त्याला तेथील कर्मचारी संजय अरुण वांढरे (२८) रा. गांधी वॉर्ड बल्लारपूर हा थांबविण्याचा प्रयत्न केले तसेच तेथील उपस्थित कर्मचारी सुद्धा वाहन थांबविण्याचा प्रयत्न केले. परंतु टाटा एसचा वाहन चालकाने त्यांच्या अंगावरूनच वाहन नेले. त्यात संजय वांढरे हा जखमी झाला असून त्याचे बरगडीचे हाडे तुटले आहे. त्याच्यावर चंद्रपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून चालक फरार झाला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)