महाराजा ट्रॅव्हल्सचा जामच्या समोर कांढळी गावाजवळ अपघात 1 मृत्यू, 5 जखमी, जखमीवर नागपुरात उपचार सुरु (Accident of Maharaja Travels near Kandli village in front of Jam 1 dead, 5 injured, treatment of injured in Nagpur)

Vidyanshnewslive
By -
0

वर्धा :- पालगाव - राजुरा - चंद्रपूर - जाम - नागपूर ला जाणारी MH 34 BZ 0009 क्रमांकाची महाराजा ट्रॅव्हल्सचा आज सकाळच्या सुमारास जामच्या समोर काढळी गावाजवळ भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त होत आहे याविषयीच्या अधिक माहिती नुसार रोज सकाळी बल्लारपूर येथून नागपूर करिता महाराजा ट्रॅव्हल्स धावत असून या ट्रॅव्हल्सने  आज सकाळच्या सुमारास जामच्या समोर कांढळी गावाजवळ उभ्या असलेल्या एका टँकरला मागून धडक दिली या अपघातात 1 व्यक्तीचा मृत्यू झाला असून 6 व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे सदर मृतक व्यक्तीच नाव धीरज कुलकर्णी वय-48 वर्ष असून ते बल्लारपूर पेपर मिल मध्ये कार्यरत होते. या अपघाताचं वृत्त कळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली अपघातग्रस्तांना त्वरित नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरु आहेत. या घटनेचा पुढील तपास जाम पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत,(विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)