बल्लारपूर पोलिसांची कारवाई, 3 महिन्यापूर्वीचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणे चांगलेच महागात पडले, 7 आरोपीना अटक (Ballarpur Police action, broadcasting of objectionable video from 3 months ago cost a lot, 7 accused arrested)
बल्लारपूर :- आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्या ६ आरोपी तसेच दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला बल्लारपूर पोलीसांनी अटक केले. ६ जून रोजी रात्रो itz chandrapur या इंन्स्टाग्राम चॅनलवर, बल्लारशाह कारवा रोड पर रात गोमाता के साथ दुष्कर्म का प्रयास, असा उल्लेख केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केलेला दिसुन आल्याने बल्लारशाह येथील बजरंग दल आणि ईतर संघटना यांनी आक्षेप घेवुन बल्लारपूर पोलिसात तक्रार दिली होती. मार्च २०२५ मध्ये विजय पाल रा मौलाना आझाद वार्ड बल्लारशाह यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग केलेली आहे, ज्यामध्ये एक ईसम हे हिंदू धर्माच्या पवित्र अशा गाय या प्राण्यासोबत दुष्कृत्य करीत आहे, सदरील आक्षेपार्ह व्हिडीओ काढून तो समाज माध्यमावर प्रसारीत केला, सदरील आक्षेपार्ह व्हिडीओ हा इंतरही लोकांनी समाज माध्यमांवर प्रसारीत करुन भावना दुखावण्याचे काम केल्याची रिपोर्ट दिल्यावरुन पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे अपराध क्रमांक ४०६ / २०२५ कलम २९९, ३(५) BNS सहकलम ६७ माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अशा प्रकारे समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारीत करुन समाजामधील शांततेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये, अशा प्रकारचा कोणताही आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर दिसुन आल्यास त्याला प्रसारीत करण्यापेक्षा त्याची माहिती सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला देण्यात यावी, याबाबत चंद्रपूर पोलीस दलाकडून वारंवार आवाहन करुन सुचना देण्यात आलेल्या असतांनाही जाणीवपुर्वक अशा प्रकारे कृत्य केल्याचे दिसुन आलेले आहे. तरुणांनी व ईतरही व्यक्तींनी समाज माध्यमांचा वापर करतांना सांभाळून करण्याचे आवाहन चंद्रपूर पोलीस दल सतत करीत आहे, एक आक्षेपार्ह मेसेज किंवा व्हिडीओ फॉरवर्ड केल्यामुळे समाजातील शांततेचे वातावरण खराब होण्यास आपण कारणीभुत होवु शकता, तेंव्हा अशा समाज माध्यमांचा वापर करतांना भान ठेवुन वापर करावे, याबाबत पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे, अन्यथा नमुद प्रकरणात ज्याप्रमाणे ईसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे, त्याप्रमाणे कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सर्वांना पुन्हा एकदा सुचित करण्यात येत आहे. सदरच्या गुन्हयाच्या तपासामध्ये गायीसोबत दुष्कृत्य करीत असलेला ईसम हा भारती नसुन तो दुसराच असल्याचे निष्पण होत असल्याने, त्याप्रमाणे तपास करुन दुष्कृत्य करीत असलेला आरोपी प्रल्हाद राठोड ६५ वर्ष रा बल्लारशाह यास ताब्यात घेवुन विचारणा केली असता, त्याने गुन्हयाची कबुली दिली, शिवाय विजय पाल यास सदरील आक्षेपार्ह व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत केला, शिवाय हर्षल उर्फ गोलु रमेश घोटेकर, विजय मधुकर ढोके, पुरुषोत्तम, नरेश शिवा वर्मा सर्व रा बल्लारशाह यांनी सदरील आक्षेपार्ह व्हिडीओ हा समाज माध्यमांवर एकमेकांना प्रसारीत केल्याचे दिसुन आले तर शुभम रा. चंद्रपूर यांनी सदरील आक्षेपार्ह व्हिडीओ हा ७ जून २०२५ रोजी बकरी ईद हा सण असतांना जाणीवपुर्वक सुमारे ३ महिण्यापुर्वीचा आक्षेपार्ह व्हिडीओला आवाज देवुन, itz_chandrapur या इंन्स्टाग्राम चॅनलवर जाणीपुर्वक प्रसारीत केल्याचे तपासात आढळुन आल्याने, यातील सर्व आरोपीतांना पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे गुन्हयाच्या पुराव्याअंती अटक करण्यात आलेली आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनुबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोलीस टी पोउपनि प्रेमशहा सय्याम, पोहवा संतोष दंडेवार, पोअं शरदचंद्र कारुष, वशिष्ट रंगारी, भास्कर चिचवलकर, सचिन राठोड यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या