चंद्रपूर :- 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य शहरातील वेगवेगळ्या भागातून दिवसभर मिरवणूका निघाल्या. या सर्व मिरवणूका मेन रोड वरील बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करून विसर्जित होतात. यावेळी मात्र जयंतीला गालबोट लागले, रात्री सुमारे 11.30 वा. एका मंडळाच्या मिरवणुकीत dj च्या नाचण्यावरून वाद होऊन पुतळा परिसरात एका व्यक्तीची हत्या झाली. ही बाब अत्यंत खेदजनक असून मृताबद्दल संवेदना आहेत . परंतु याला जबाबदार कोण ? हा प्रश्न आता चर्चिल्या जात आहे . याच पुतळा परिसरात बॅरिस्टर खोब्रागडे यांचे पुतणे प्रवीण उर्फ बाळू खोब्रागडे हे शतकोत्तर समिती, रिपब्लिकन पक्ष, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल यांचे संयुक्त विद्यमाने जयंती महोत्सवाचे आयोजन करतात, उदघाट्नासाठी आमदार, खासदार, एस.पी., कलेक्टर याना बोलवितात, कर्मचारी, अधिकारी, व्यावसायिक यांचेकडून लाखोची वर्गणी गोळा करतात , पुतळ्याजवळ पेंडाल टाकतात, भाषणे होतात. अर्थातच या दिवशी या परिसरातील व्यवस्थेची जबाबदारी बाळू खोब्रागडे आणि त्यांच्या सर्व संघटना व कार्यकर्त्यांची आहे. मग असे असताना या परिसरात हत्या होते, एका व्यक्तीचा जीव जातो, त्याचे कुटुंब निराधार होते , जयंतीला गालबोट लागते अशावेळेस आयोजक, त्यांच्या संघटना, स्वयंसेवक कार्यकर्ते कुठे असतात ? एस.पी., कलेक्टर, आमदार, खासदार यांचे समोर नेता म्हणून मिरविणे एवढाच यांचा उद्देश असतो का ? तर सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना व्यवस्था आणि वेळेबद्दल मार्गदर्शक पूर्वसूचना का देत नाही ? याला पोलिसही जबाबदार आहेत का ? युवा पिढी भरकटत चालली त्याला जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत, चर्चेचा विषय झाले आहेत. तसेच विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार चंद्रपूरातील बागला चौक येथे भिम जयंतीच्या मिरवणुकीत डान्स वरून वाद झाल्याची चर्चा असली तरी यावरून दुसऱ्या दिवशी काही हिंसक प्रवृत्तीचे व्यक्ती सशस्त्रपणे घेऊन जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत होते. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करून काही तरुणांना अटक केल्याचे वृत्त आहे. एकूणच ज्या महामानवाने आपल्या जिवाची लाही लाही करून आम्हाला सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला त्या महामानवाच्या जयंतीला अशा प्रकारचं गालबोट लागण कितपत योग्य आहे याला नेतेच जबाबदार नसून प्रत्येक अनुयायांची जबाबदारी आहे की अशा कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीना वेळीच नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.
चंद्र्पूरात भीमजयंतीला गालबोट, एका व्यक्तीची झाली हत्या, जबाबदार कोण ? (Blemish on Bhim Jayanti celebrations in Chandrapur: One person murdered—who is responsible?)
By -
४/१९/२०२६ ०३:०३:०० PM
0
चंद्र्पूरात भीमजयंतीला गालबोट, एका व्यक्तीची झाली हत्या, जबाबदार कोण ? (Blemish on Bhim Jayanti celebrations in Chandrapur: One person murdered—who is responsible?)

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या