बल्लारपूर :- दिनांक- १८/०४/२०२६ रोजी पोलीस स्टेशन बल्लारपूर चे डीबी स्टाफचे टिम यांना दोन इसम हातात हत्यार घेवून किल्ला वार्ड, बल्लारपूर भागात फिरत असल्याचे मुखबीख्दारे खात्रीशीर माहीती मिळालेवरून पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच आदेशाने डीबी स्टाफ पेट्रोलीग करीत असतांना सायंकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान आरोपी नामे गौरव सुनिल कुकुडकर व बालाजी उर्फ कातीक शिवा मोहुर्ले दोन्ही राहणार किल्ला वार्ड या दोन इसमास ताब्यात घेतले, त्यांचजवळ एक लोखंडी फायटर व चाकू मिळून आला ते जप्त करून त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केले असता विष्णु वलसा व अनुराग मातंगी यांगा अग्निशस्त्र विकी केल्याबाबत सांगीतले त्यावरून डीबी स्टाफने विष्णू यास ताब्यात घेवून च अनुराग मातंगी यांचे राहत्या घरात जावून झडती घेतले असता त्याचे घरी देशी बनावटीचे सिंगल बेरेल ७.६५ एम्.एम बोअर असलेले एक माउजर अग्नीशस्त्र किंमत ४५,०००/- रूपये व ४ जिवंत काडतूस १०,०००/- अवैधरीत्या व विनापरणा दहशत माजविन्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगून असतांना मिळून आला तरी त्यास ताब्यात घेवून अग्निशस्त्र व काडतूस, दुचाकी असे एकून १०,५१००/- रूपयाचे मुद्देमाल दोन पंचासमक्ष पंचणामा करून जप्त करण्यात आले असून गौरव सुनिल कुकुडकर, बालाजी उर्फ कातीक शिवा मोहुर्ले दोन्ही रा. किल्ला वार्ड बल्लारपूर, विष्णू भास्कर वलसा, रेल्वे वार्ड, अनुराग आनंदराव मातंगी, य. श्रीराम वार्ड, विराज आगदारी, किल्ला वार्ड, बल्लारपूर यांवेविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अप क. ४६६/२०२६ कलम ३. २५, ७, २७ भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले, तरी सदर अग्निीशस्त्र कोठून आणले व उद्द्देश काय होता याबाबत अधिकचा तपास पोलीसांद्वारे करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन सा, अप्पर पोलीस अधिक्षक इश्वर कातकडे सा, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव सा. यचि गार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे सा यांच नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि अभिषेक जंगमवार, उमेश जोगदंड, पोहवा संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, संतोश दंडेवार, प्रविण निकोडे, मोहन निषाद, पंकज शिंदे, विकास जुमनाके, सचिन अल्लेवार, पोअं लखन चव्हाण, खंडेराव माने, गुरू शिंदे, वैभव गाडगे, शरद कारूष, अनिता नायडू, यांनी केली. अशी माहिती विपीन इंगळे पोलीस निरीक्षक बल्लारपूर, जि. चंद्रपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या