चंद्रपूरचे माजी जिल्हाधिकारी विनय गौडा व नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा उद्या 19 एप्रिलला कृतज्ञतापूर्वक भव्य नागरी सत्कार व निरोप समारंभ (A grand civic felicitation and farewell ceremony, marked by gratitude, will be held tomorrow, April 19, for former Chandrapur District Collector Vinay Gowda and the new District Collector, Vasumana Pant.)
चंद्रपूर :- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचा कृतज्ञतापूर्वक नागरी सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या वसुमना पंत यांचे स्वागत व सत्कारही करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे होणार आहे. या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तत्पूर्वी चंद्रपूरचे माजी जिल्हाधिकारी तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा सर यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याने विकासात भरारी घेतली. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले. नंदूरबारमध्ये त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मिळाली. चंद्रपुरात त्यांनी चांगली टीम निर्माण केली. त्यांनी रचलेल्या पायाचा आणखी विस्तार करून चंद्रपुरला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. तर चंद्रपुरचे नाते आणि आठवण कायम स्मरणात राहील. येथील कार्यकाळाबद्दल आपल्याला नेहमी कृतज्ञता आणि अभिमान राहील, अशा भावना चंद्रपुरचे माजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलतांना विनय गौडा म्हणाले की 14 ऑक्टोबर 2022 ला चंद्रपूर जिल्ह्यात रुजू झालो, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, पहिल्यांदा जिल्हाधिकारी होण्याची संधी चंद्रपूर जिल्ह्यात मिळाली. चंद्रपूर हा जिल्हा राज्याच्या शेवटच्या टोकावर असून विविधतेने नटलेला जिल्हा आहे. येथे खुप गोष्टी शिकायला मिळाल्या. साडेतीन वर्षाचा कार्यकाळ आपल्यासाठी अविस्मरणीय राहिला. सर्व टीम मिळून एकजुटीने जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले, याचा आनंद आहे. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू शकलो, याचेही समाधान आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुरच्या वतीने आज (दि.18) नुतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा स्वागत समारंभ आणि माजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना दोन्ही जिल्हाधिकारी बोलत होते. नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या