यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात सम्राट अशोक कालीन अवशेष सापडले, पुरातत्व विभागाचा शोध सुरु (Remains of Emperor Ashoka's era found in Babhulgaon taluka of Yavatmal district, archaeological department begins search)
वृत्तसेवा :- यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड या गावात मागील तीन हजार वर्षापूर्वीची वस्ती आढळली आहे. भगवान गौतम बुध्द, सम्राट अशोक कालीन मडक्याचे तुकडे आढळून आले. एवढेच नाही तर सातवाहन राजवंश कालीन सहा विहिरी आढळल्या आहेत. येथे नागपूर येथील पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले असून, त्यांनी उत्खन्न सुरु केले आहे. महापाषाण लोहयुगीन काळातील लोकवस्तीमधील घरे हे गोलाकार आकारचे असून कुडाचे होते. पाचखेड उत्खननामध्ये महापाषाण लोहयुगीन काळातील लोखंडाचे पुरावे तसेच घरामध्ये तत्कालीन चुलीसुध्दा मिळालेल्या आहेत. पाचखेड या उत्खनन स्थळाला सासू-सुनेचे उखाडे आणि बरड या नावाने ओळखल्या जाणारी पांढऱ्या मातीचे टेकडी सद्या पाचखेड गावातील स्मशानभूमी म्हणून उपयोगात आणली जाते. येथे २६ मार्च २०२५ पासून संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा अंतर्गत प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभास साहू आणि नागपूर विद्यापीठ सहसंचालक प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरु आहे. सन २०२५ मधील उत्खननामध्ये इसवी सन पूर्व १००० म्हणजेच आतापासून तीन हजार वर्षापूर्वीच्या काळातील महापाषाण लोहयुगीन काळातील लोकवस्तीच्या घराचे पुरावे मिळालेले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभास साहू, प्रा.डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. मोहन पारधी, डॉ. एकता धारकर, भदंत आनंद आणि ढोकणे यांचा उत्खनन चमूमध्ये समावेश आहेत. पाचखेड उत्खनन पुढे १५ दिवस सुरु राहू शकते. पाचखेड उत्खननास यवतमाळचे पुरातत्व संशोधक गोपीचंद कांबळे, श्रीमती नानकीबाई वाधवाणी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सिध्दार्थ जाधव, भारतीय बौध्द महासभा यवतमाळ जिल्हा प्रमुख मोहन भवरे, सरचिटणीस रुपेश वानखडे, गोपाळराव लोणारे, प्रज्ज्वल कांबळे, संबोधी जाधव, सम्राट कांबळे यांच्यासह भेट दिली. यावेळी त्यांनी प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांच्या सोबत चर्चा करुन पाचखेड उत्खननाबाबत माहिती जाणून घेतली. पाचखेड येथे सन २०२४ मध्ये मार्च-एप्रिलमध्ये उत्खनन झाले. यावर्षी पाचखेड उत्खननाचे सलग दुसरे वर्ष आहे. यापुर्वी जिल्ह्यातील आर्णी येथे १९७८, १९८५ मध्ये पुरातत्व विभागाने उत्खन्न केले होते. वणी तालुकयातील कायर येथे २०१३ व २०१५ मध्ये उत्खन्न करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील हे सहावे उत्खन्न असल्याची माहिती पुरातत्व संशोधक गोपीचंद कांबळे यांनी दिली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या