धक्कादायक ! बल्लारपूरात चार तरुणांकडून बँक कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला (Shocking ! Four youths fatally attack bank employee in Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! बल्लारपूरात चार तरुणांकडून बँक कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला (Shocking ! Four youths fatally attack bank employee in Ballarpur)

बल्लारपूर :- स्टेट बँक ऑफ इंडिया चंद्रपूर शाखेत क्रेडिट कार्ड सेल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर चार अनोळखी तरुणांनी अचानक हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर शहरात घडली असल्याची माहिती आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद आकिब मोहम्मद बशीर शेख (वय ३१), रा. गांधी चौक, काझी मोहल्ला, राजुरा हे आपल्या मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी बल्लारपूर येथील एकदंत लॉन येथे आले होते. लग्नाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते मोटारसायकलने परत राजुराकडे निघाले असता, डॉ. हजारे हॉस्पिटलसमोर एक अनोळखी युवकाने त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या आणखी तीन तरुणांनी त्यांच्यावर कडयांनी, बुक्यांनी आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर मार लागला. त्यांना काही काळ शुद्ध हरपल्याने ते खाली बसले असता, हल्लेखोरांनी त्यांच्या पाठीवरही काठीने मारहाण केली. हल्ल्यानंतर फिर्यादी पळून जाऊन जवळील गल्लीत लपले व मित्राना फोन करून मदत मागितली. मारहाण करणारे चारही तरुण अंदाजे २५ ते २७ वयोगटातील असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. यावरून त्यांनी पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार नोंदवली. प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)