चंद्रपूर :- जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोमवारी १२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यानुसार महिला पोलिस निरीक्षक लता वाढीवे यांची कोरपना पोलिस ठाण्यात बदली केली. त्या यापूर्वी चंद्रपूर सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. दरम्यान, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक दारासिंग राजपूत यांची कल्याण शाखेत नियुक्ती करण्यात आली. अप्लिकेशन्स(अर्ज) शाखेतील महिला पोलिस निरीक्षक प्रभावती एकुर्के यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली. रामनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर यांना भरोसा सेलची जबाबदारी देण्यात आली. एलसीबीमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर हनवटे यांना चिमूर पोलिस ठाण्यात, सपोनि जितेंद्र चांदे यांना कन्व्हिक्शन रूममध्ये, पोलिस उपनिरीक्षक हरिदास चोपणे यांना माजरी पोलिस ठाण्यात, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कुंभारे यांना मूल पोलिस ठाण्यात, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोले यांना शेगाव पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली. प्रोबेशनरी पोलिस उपनिरीक्षक मनीष तालेवार यांना वरोरा पोलिस ठाण्यात, पोलिस उपनिरीक्षक अतुल राठोड यांना राजुरा आणि पोलिस उपनिरीक्षक पंकज वासाडे यांना दुर्गापूर पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या