चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई, दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार लोखंडी खंजर सह १७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Chandrapur city police conduct major operation, seize two country-made knives, two Mauser guns, 35 live cartridges, four iron daggers and valuables worth Rs 17 lakh 45 thousand)
चंद्रपूर :- २० ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील डि.बी. पथकाने मोठी कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार लोखंडी खंजर व इतर साहित्य असा एकूण १७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डि.बी. पथक पेट्रोलिंग दरम्यान असताना मिळालेल्या गुप्त माहितीडस्टर गाडीची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटखालील पिशवीतून दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजर व अन्य साहित्य आढळले. या प्रकरणी अपराध क्र. ७५८/२०२५, कलम ३१०(४) भा.दं.वि. सह कलम ३, ४, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नुसार रेकार्डवरील आरोपी छोटू सूर्यवंशी (रा. बल्लारपूर) हा आपल्या काही साथीदारांसह काळ्या रंगाच्या डस्टर गाडीतून गंजवार्ड येथील दादामिया ट्रान्सपोर्ट गॅरेज समोर देशी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी दोन पंचांसह पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी प्रमोद चौघुले, पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके (पो. स्टे. चंद्रपूर शहर) यांच्या नेतृत्वात सपोनी राजेंद्र सोनवणे, पो.उ.नि. दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पो.ह.वा. लक्ष्मण रामटेक, संजय धोटे, इम्रान शेख, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदुरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, म.पो.अ. दीपीका झिंगरे व सारीका गौरकार यांनी संयुक्तपणे केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068






टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या