बल्लारपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील नगर परिषदेच्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आता दुकाने व शुभेच्छांचे फलक (बॅनर) लावता येणार नाही. कारण नगर परिषदेने बॅनर व दुकाने लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची बॅनर लावले आहे. यामुळे कोठेही बिनधास्त शुभेच्छा फलक लावणाऱ्यांना चाप बसेल काय याची चर्चा शहरात होत आहे. सध्या शहरात व वॉर्डात शुभेच्छा, अभिनंदन करणाऱ्यांचे फलक (बॅनर) बिना क्युआर कोडशिवाय लावणाऱ्यांकडे नगर परिषदेचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे. क्यूआर कोड लावणे आवश्यक आहे. नसल्यास अशा जाहिरातीचे फलक बेकादेशीर असल्याचे गृहीत धरून अनधिकृत व बेकायदेशीर बॅनर जप्त करून दंडात्मक कारवाही करण्यात येईल, असे नगर परिषदेतर्फे आवाहन केले असताना शहरात शासकीय कार्यालयासमोर अनेकांनी क्यूआर कोड नसलेले बॅनर लावले. परंतु यावर कारवाई नगरपरिषद चौकात नगर परिषदने लावलेले कारवाईचे फलक करण्याकडे नगर परिषदने दुर्लक्ष केले. या संदर्भात नगर परिषदेच्या संबंधित विभागाने सांगितले की, आम्ही सांगत असतो की सूचना दिलेल्या ठिकाणीच क्यूआर कोड असलेले फलक लावावे. शहरात अवैध फलकबाजीचा चांगलाच भडिमार सुरू असून क्यूआर कोड नसलेल्या फलकाकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक चौरस्त्यावर मोठमोठे होर्डिंग, बॅनर बस स्टॅन्ड, शासकीय कार्यालयासमोर लावत असल्याने शासकीय इमारत दिसत नाही. आणि मुदत संपूनही बॅनर निघत नाही. नागरिकांकडून फलक झेंडे लावण्यासंदर्भात पोलिस स्टेशनकडून दोनदा नगर परिषदेला पत्र देण्यात आले. नियमानुसार दिलेल्या वेळेत लावलेले फलक, बॅनर नगर परिषदेने काढून टाकावे, असे सांगितले आहे. परंतु नगर परिषद याकडेही नेहमी दुर्लक्ष करते. विशेष म्हणजे, पालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी नव्या जाहिराती झळकत असल्याचे चित्र आहे. शहरात व वॉर्डात नगरपालिकेने निश्चित केलेल्या स्थळांच्या ऐवजीदेखील शासकीय कार्यालयासमोर आणि चौक तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी फलक झळकत आहेत. आता नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दुकाने व फलक लावणाऱ्या किती जणांवर फौजदारी कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या