मुंबई :- राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडली यात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माहिती देतांना राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदान करणार आहेत. राज्यभरात संबंधित नगरपरिषद वं नगरपंचायतीच्या क्षेत्रात आचार संहिता लागू झाली 7 नोव्हेंबरला मतदानकेंद्र निहाय अंतिम मतदार यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. 10 नोव्हेंबर ला नामनिर्देशन दाखल करण्याचा दिवस असून 17 नोव्हेंबर नामनिर्देशन अंतिम तारीख असून नामनिर्देशन परत घेण्याची अंतिम मुदत (अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर) असून 26 नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह वाटप होण्याची शक्यता आहे. तसेच 2 डिसेंबरला राज्यभरात एकाच टप्प्यात नगरपरिषद वं नगरपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार असून 3 डिसेंबर ला राज्यभरात नगरपरिषद वं नगरपंचायत मतमोजणी होणार असून 10 डिसेम्बरला नगर परिषद वं नगर पंचायत निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात येईल. विशेष म्हणजे राज्यभरात 246 नगर परिषद वं 42 नगरपंचायत साठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर होणार असून यासाठी 288 मतदान केंद्राधिकारी वं 288 मतदान सह केंद्राधिकारी नियुक्त करण्यात आले असून निवडणुका होत असून याद्वारे 288 अध्यक्षाची निवडणूक तर जवळपास 6800 नगरसेवकांची निवडणूक होणार आहे याकरिता दुबार मतदार नोंदणी असलेल्या मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह राहणार असून ज्या मतदान केंद्रावर संबंधित मतदाराचे नाव असेल त्यांच्याकडून शपथपत्र भरून घेणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या