स्थानिक गुन्हे शाखेची लोहारा येथील ‘हॉटेल ताडोबा अतिथी इन’ येथे धाड, एकास अटक (Local Crime Branch raids 'Hotel Tadoba Athi In' in Lohara, one arrested)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची लोहारा येथील ‘हॉटेल ताडोबा अतिथी इन’ येथे धाड, एकास अटक (Local Crime Branch raids 'Hotel Tadoba Athi In' in Lohara, one arrested)

चंद्रपूर :- 31 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रामनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. यावेळी त्यांना विश्वनसीय सूत्रांच्या माहितीनुसार गुप्त माहिती मिळाली की, लकी नावाचा एक मुलगा हॉटेल ताडोबाll हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे छापा टाकला असता, आरोपी लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय 26), रा. अलवर, राजस्थान हा हॉटेलमध्ये एका पिडीत महिलेकडून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता वेश्या व्यवसाय करून उपजीविका करत असल्याचे निष्पन झाले. यावरून रामनगर पोलिस स्टेशन येथे कलम 3,4,5,7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, चंद्रपूर, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनील गौरकर, सहायक फौजदार धनराज कारकाडे, पोलिस हवालदार सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बदमवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम, महिला पोलिस छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तितरे, तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सरिता मालू, रेखा भारसकडे यांनी केली आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
           

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)