विषारी सर्प पकडतांना सर्पमित्रांचा सर्पदंशाने बल्लारपूरातील तरुण महेंद्र भडके यांचा मृत्यू (Mahendra Bhadke, a young man from Ballarpur, died of snakebite while catching a poisonous snake.)
बल्लारपूर :- पावसाळी दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे सर्प आपल्या बिळातून बाहेर निघतात अशाच प्रकारचा विषारी सर्प बल्लारपूर पेपर मिल न्यू कॉलनी परिसरात सर्प पकडण्याचा प्रयत्न करनाऱ्या सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बल्लारपूर शहरात घडली आहे. महेंद्र भडके (वय ३२), रा. विद्यानगर वार्ड, सावित्रीबाई फुले चौक, बल्लारपूर असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. ही घटना आज सकाळी अंदाजे १०.३० वाजता घडली. बल्लारपूर पेपर मिल परिसरातील न्यू कॉलनी येथील नर्सरीमध्ये नाग जातीचा सर्प दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर महेंद्र भडके हे सर्प पकडण्यासाठी तेथे गेले होते. सर्प पकडण्याच्या प्रयत्नात असताना सर्पाने त्याला दोन वेळा दंश केला. महेंद्रला लगेच तातडीने ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात येत होते. दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे महेंद्र भडके हे शहरातील ओळखलेले सर्पमित्र होते. विविध भागात साप पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याचे कार्य ते सातत्याने करत असत. त्यांच्या अकस्मात निधनाने बल्लारपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या