राज्य सरकारचा मोठा निर्णय, निवडणुकीपूर्वीच जात पळताळणी सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदतवाढ (Big decision of the state government, 6-month extension to submit 'caste list' before the elections)

Vidyanshnewslive
By -
0
राज्य सरकारचा मोठा निर्णय, निवडणुकीपूर्वीच जात पळताळणी सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदतवाढ (Big decision of the state government, 6-month extension to submit 'caste list' before the elections)


मुंबई :- महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणे अपेक्षित आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्रामविकास विभाग, विधि न्याय विभाग, महसूल, नगरविकास आदी महत्त्वाच्या विभागांचे निर्णय घेण्यात आले. निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने निवडणुकीआधीच 'कास्ट व्हॅलिडिटी'चा विषय निकाली काढला आहे. महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश २०२५ काढण्यास मान्यता प्रदान करण्यात येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)