बल्लारपूर - कारवा जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू, वनविभागाच्या व अति शीघ्र दलाच्या अथक प्रयत्नातून वाघ जेरबंद (Ballarpur - One person died in a tiger attack in Karwa forest, the tiger was arrested by the efforts of the forest department and the speedy force.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर - कारवा जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू, वनविभागाच्या व अति शीघ्र दलाच्या अथक प्रयत्नातून वाघ जेरबंद (Ballarpur - One person died in a tiger attack in Karwa forest, the tiger was arrested by the efforts of the forest department and the speedy force.)


बल्लारपूर :- आज दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी बल्हारशाह वनपरिक्षेत्रात थी. नगिन पुगलिया, बांबु कंत्राटदार, चंद्रपुर यांना वाटप करण्यात आलेल्या बांबु युनीट क्रं 05 बल्हारपुर येथे श्री. लालसिंग बरेलाल मडावी, वय 57 वर्ष, रा. मणिकपुर माल (बेहराटोला) तह.बिछाया, जि. मंडला, राज्य मध्यप्रदेश हे नियतक्षेत्र बल्हारशाह मधील राखीव वनखंड क्रमांक 493 मध्ये बांबु निष्कासनाची कामे करीत असतांना सकाळी 10.00 वाजताचे सुमारास त्यांचेवर वाघ या वन्यप्राण्याने हल्ला करुन त्यांना जागीच ठार मारल्याची घटना घडली. घटनेची माहिती प्राप्त होताच सहाय्यक वनसंरक्षक, (वनी व वन्य) मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर व वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे आपले अधिनस्त वनकर्मचारी यांचे सोबत तात्काळ मौका स्थळी हजर झाले. मौकयावर पाहणी केली असता श्री. लालसिंग बरेलाल मडावी यांच्या मृतदेहाजवळच वाघ बसुन होता. सदर वाघाला हुसकावुन लावण्याचा प्रयत्न केला असता वाघ हा वनकर्मचारी यांचे दिशेने चाल करुन येत होता. सदर वाघ हा मृतदेहाजवळ बराच वेळा पासुन बसुन असल्यामुळे दुपारी 5.00 वाजताचे सुमारास अति शिघ्र दल, बल्हारपुर यांना पाचारण करुन श्री. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव उपचार केन्द्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात शुटर श्री. अविनाश फुलझेले, वनरक्षक यांनी वाघाला गनव्दारे डॉट मारुन सदर वाघाला बेशुध्द केले. सदर बेशुध्द वाघाची पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करुन त्यास पिंजऱ्यात बंद करुन पुढील तपासणी करीता वन्यजीव उपचार केन्द्र, चंद्रपुर येथे नेण्यात आले. सदर वाघ हा नर असुन अंदाजे 4 वर्षाचा असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरती सानृग्रह आर्थिक मदत देण्यात आले. सदर कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. श्वेता बोड्डु, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय वनाअधिकारी, राजुरा श्री. पवनकुमार जोंग व सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे यांनी पुर्ण केली. सदर कार्यवाही दरम्यान पोलीस निरिक्षक, बल्हारशाह श्री. सुनिल गाडे, क्षेत्र सहाययक श्री.के.एन. घुगलोत, श्री.व्हि.पी. रामटेके वनरक्षक श्री. सुधीर बोकडे, श्री.अनिल चौधरी, श्री.धर्मेन्द्र मेश्राम, श्री. सुरेन्द्रकुमार देशमुख, श्री.तानाजी कामले कु. वर्षा पिपरे, कु.उषा घोडवे, कु.वैशाली जेनेकर, कु.माया पवार, कु. पुजा टोंगे व RRU बल्हारशाह पथक व पोलीस स्टेशन, बल्हारपुर चे पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले. बल्हारशाह - कारवा जंगल परिसरात हित्र वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे नागरीकांनी वनात प्रवेश करु नये असे आव्हान वनविभागा मार्फत करण्यात येत आहे. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)