चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह 8 ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपुरद्वारे विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप, त्रुटीपुर्तता, जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे स्विकारणे, मार्गदर्शन करणे, आदीबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील 12 वी विज्ञान शाखेतील सत्र 2025-26 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान करून विद्यार्थ्यांना विहित वेळेत जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणपत्र पडताळणी केली नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपला रितसर, परिपूर्ण भरलेला अर्ज तात्काळ सादर करावा.
तसेच एमएचटी-सीईटी, नीट, जेईई, एमबीए, एलएलबी, एमसीए, बीबीए, बीएड, पीएचडी, बीएस्सी ॲग्री, बी.फॉर्म, बीएस्सी निर्सिंग इत्यादी सीईटी देऊन व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छीत असणारे व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाला प्रवेशित असणारे, ज्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचे आहे, अशा अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी जातप्रमाणत्र पडताळणीकरीता अर्ज सादर केले आहे. परंतु अपूर्ण पुराव्याअभावी ज्यांची प्रकरणे त्रुटीमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्रुटीपूर्ततेकरिता 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान कार्यालयास संपर्क साधुन लवकरात लवकर त्रुटीची पुर्तता करून घ्यावी. 13 एप्रिल रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयमार्फत विशेष मोहिमेअंतर्गत ऑनलाईन जातवैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे समितीचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत,) (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या