महात्मा फुले महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर व मार्गदर्शन पर कार्यक्रमाच आयोजन (Mahatma Phule College organizes health check-up camp and guidance program on Women's Day by Sociology Department)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर व मार्गदर्शन पर कार्यक्रमाच आयोजन (Mahatma Phule College organizes health check-up camp and guidance program on Women's Day by Sociology Department)

बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागातर्फे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय समाजशास्त्र विभागातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्त विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संजयभाऊ कायरकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजत मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. कोमल चांदेकर उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थान डॉ. स्वप्निल बोबडे यांनी भूषविले. मंचावर हिंदी विभाग प्रमुख डॉ. पल्लवी जुनघरे व प्रा. सोनाली कायरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले. 


             या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . यामध्ये विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन, रक्तगट, शुगर, बीपी तसेच इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. विद्यार्थिनींच्या आरोग्याशी संबंधित समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. कोमल चांदेकर यांनी या वयात मुलींना उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


            या आरोग्य तपासणी शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल चांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ कु. प्रज्ञा रामटेके, डॉ. हर्ष ओत्सवाल (इंटर्न, Government Medical College Chandrapur), डॉ. फराझ तांबोळी (इंटर्न, Government Medical College Chandrapur) तसेच कु. उर्मिता रॉय (इंटर्न, Sai Paramedical College) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


        अध्यक्षीय भाषणात डॉ. स्वप्निल बोबडे यांनी स्त्रियांच्या सशक्तीकरणावर आधारित कविता सादर करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)