LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट (LPG gas cylinder booking rules changed again, new conditions for rural and urban areas)

Vidyanshnewslive
By -
0
LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट (LPG gas cylinder booking rules changed again, new conditions for rural and urban areas)

वृत्तसेवा :- इराण-इस्रायल युद्धाच्या झळा आता महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचल्याचे दिसत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचे समजताच बुकिंगसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. त्यातच घरगुती LPG गॅस सिलेंडर वितरण प्रणालीत सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. बुकिंगच्या या नव्या नियमानुसार दोन सिलेंडर घेण्यामधील कालावधीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आता ग्रामीण भागात ४५, तर शहरात ४० दिवसांनंतरच नवीन सिलेंडरचे बुकिंग करता येणार आहे. याआधी हे अंतर २५ दिवसांचे होते, ज्यात आता वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून, रत्नागिरीमध्ये गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 
          सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन समस्या निर्माण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळेच आता सामान्य माणूस गॅस एजन्सीबाहेर रांगा लावताना पाहायला मिळत आहे. मोबाईलवरून गॅस बुकिंग होत नसल्यामुळे आता थेट गॅस एजन्सीवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. एकूणच सामान्य माणूस या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त झाल्याचे चित्र दिसतेय. कराड येथील 'भारत गॅस एजन्सी' येथील परिस्थितीचा आढावा घेऊन सामान्य नागरिकांशी बातचीत केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांत होत असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत आहे. सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या गॅस एजन्सीवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अमरावती आणि कोल्हापूरमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप करण्यात येत आहे. गॅस वितरण करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उन्हाचे चटके सोसत अनेक नागरिक रिकाम्या गॅस टाक्या घेऊन रांगेत उभे आहेत. गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांत होत असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत आहे. सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या गॅस एजन्सीवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अमरावती आणि कोल्हापूरमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप करण्यात येत आहे. गॅस वितरण करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उन्हाचे चटके सोसत अनेक नागरिक रिकाम्या गॅस टाक्या घेऊन रांगेत उभे आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)