दिवंगत प्रमोद अभिमन्यू फुलकर यांच्या पहिल्या स्मृतीप्रित्यर्थ बुध्द विहारांना फुलकर कुटुंबियांच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमा भेट (On the occasion of the first death anniversary of the late Pramod Abhimanyu Phulkar, the Phulkar family presented portraits of great historical figures to various Buddhist Viharas.)
चंद्रपूर :- दिवंगत प्रमोद अभिमन्यू फुलकर यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्य सिद्धार्थ बौद्ध मंडळ, नांदगाव (पोडे) तसेच सुपटिपन्नो बहूउद्देशीय बुद्ध मंडळ, जुनोना रोड बाबूपेठ, यांना महामानवांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचावे या एकमेव उद्दात हेतू लक्षात ठेवून फुलकर कुटुंबियांच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आल्या, एक सामाजिक बांधिलकी म्हणून अशा प्रकारच्या उपक्रमातून समाजाला प्रगती कडे नेणारा संदेश देण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रा. डॉ. रोशन फुलकर, डॉ. वृंदा फुलकर, श्रीमती सुमन फुलकर, जयमाला फुलकर, कुटुंबातील सदस्य, आप्तेष्ट, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या