स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : डॉ. मुंधडा हॉस्पिटलमध्ये चोरीप्रकरणी एक आरोपी ताब्यात तर दुसरा फरार (Action of Local Crime Branch: Dr. One accused in the theft case in Mundha Hospital and the other is absconding)
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील दिक्षित वार्ड परिसरातील डॉ. मुंधडा हॉस्पिटलमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीस ताब्यात घेत चोरीस गेलेली रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. याबाबत डॉ मनिष गोपाल मुंधडा (४८), रा. दिक्षित वार्ड, पंचशील वार्ड यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ४ एप्रिल रोजी रात्री अज्ञात इसमाने हॉस्पिटलच्या केबिनमध्ये प्रवेश करून लाकडी आलमारीतील सुमारे ६० हजार रुपयांची रोकड चोरी केली होती. या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अतुल उर्फ मुजोर विकास राणा (वय २५), रा. शामनगर चंद्रपूर हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी श्रीकांत उर्फ बोटतुट्या राजू चुनारकर (वय २३), रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी चंद्रपूर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं किशोर वाकाटे, पोअं शशांक बदामवार यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या