क्लारा झेटकीन : महिला दिन सुरू करणारी 'बंडखोर' नायिका, जिनं हिटलरच्या उघड विरोधाचं धाडस केलं (Clara Zetkin: The 'rebellious' heroine who started Women's Day, who dared to openly oppose Hitler)

Vidyanshnewslive
By -
0
क्लारा झेटकीन : महिला दिन सुरू करणारी 'बंडखोर' नायिका, जिनं हिटलरच्या उघड विरोधाचं धाडस केलं (Clara Zetkin: The 'rebellious' heroine who started Women's Day, who dared to openly oppose Hitler)

वृत्तसेवा :- आज 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून वाजतगाजत साजरा केला जात असला तरी या ऐतिहासिक दिनामागचा क्रांतीक्रारी इतिहास बहुतांशी दुर्लक्षितच राहिलेला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उगम हा खरंतर महिला काममार चळवळीच्या संघर्षात दडलेला असून एका साम्यवादी महिलेनं महिला कामगारांचं शोषण रोखून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची हाक दिली होती. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा हा प्रस्ताव पहिल्यांदा मांडणारी ही क्रांतीकारी महिला म्हणजे क्लारा झेटकीन. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला कामगार संघटनेच्या परिषदेत क्लारा झेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची हाक दिली आणि तेव्हापासून दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी अमेरिकेतील महिला कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाची नोंद घेत क्लारा झेटकीन यांनी हे पाऊल उचललं होतं. पण यामागे त्यांनी बरीच वर्ष महिला आणि कामगारांच्या लढ्यासाठी खर्ची घालत रचलेला सैद्धांतिक पाया देखील तितकाच महत्त्वाचा होता. त्या अर्थाने अमेरिकेतील महिला कामगारांचं आंदोलन हे फक्त एक निमित्त ठरलं. कामगारांचे प्रश्न सोडवल्याशिवाय महिलांना न्याय मिळवून देणं शक्य नाही, हे या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं क्लारा झेटकीन यांनी ठासून सांगितलं. 
         1907 साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कामगारांंनी विविध मागण्यांसाठी एक संप पुकारला. मुख्यतः तिथल्या कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या या महिला कामगार होत्या. वेतनवाढ, कामाच्या तासांचं नियमन आणि कामगार संघटना स्थापन करण्याचा अधिकार या तीन प्रमुख मागण्यांसाठी सुरू झालेला हा संप बघताबघता एका राष्ट्रीय आंदोलनाचा भाग बनला. 1909 साली तर या आंदोलनात न्यूयॉर्क शहरातील कापड उद्योगामधील तब्बल 20 हजार कामगारांनी 13 दिवसांचा संप पुकारला. या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली. त्यातूनच प्रेरणा घेत कोपनहेगन परिषदेत कामगारांचे हक्क आणि महिलांचा समतेचा अधिकार अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा प्रस्ताव क्लारा झेटकीन यांनी मांडला. यानंतर प्रत्येक वर्षी युरोपात 8 मार्च रोजी कामगार व महिलांचे भव्य मोर्चे निघायला सुरूवात झाली. ही फक्त एक सामाजिकच नव्हे तर राजकीय चळवळ बनली. नाझींच्या सत्तेखालील जर्मन संसदेत हे धारदार भाषण दिल्यानंतर पुढच्या दोनच महिन्यात त्यांचा वृद्धापकाळाने 20 जून 1933 रोजी मृत्यू झाला. पण क्लारा झेटकीन यांनी जवळपास 100 वर्षांपूर्वी महिलांचे प्रश्न, कामगारांचे शोषण, युद्धाची निरर्थकता आणि फासीवादाचा धोका अशा अनेक विषयांवर करून ठेवलेली मांडणी आजही तितकीच संयुक्तिक व दिशादर्शक आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी फक्त उत्सवीकरणात न अडकता हा दिवस नेमका साजरा कशासाठी केला जातो, याचा विसर न पडू देणं हीच क्लारा झेटकीन यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)