जय महाराष्ट्र निमशासकीय व शासकीय अधिकारी व कर्मचारी लिपिक वर्गीय संघटनेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूरच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा (Jai Maharashtra Semi-Government and Government Officers and Employees Clerical Class Association, Government Medical College and Hospital Chandrapur, warns of work stoppage in line with various demands)
चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनामधील मुख्य आधारस्तंभ असलेले लिपीक वर्गीयाचे चौथ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटीची दुरुस्ती करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, पदोन्नती मधील स्तर कमी करून पदनामात बदल करणे, तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे, या संबंधात जय महाराष्ट्र निमशासकीय व शासकीय अधिकारी व कर्मचारी लिपिक वर्गीय संघटनेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील लिपिक संवर्गीय यांच्याद्वारे संस्थाप्रमुख मा. अधिष्ठाता यांना दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी निवेदन दिले असून आज असहकार आंदोलनाचा तिसरा दिवस असून शासनाने लवकरच लिपिक वर्गीय संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत काही उपाययोजना न केल्यास 23 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.
सदर निवेदन देते वेळेस जय महाराष्ट्र लिपिक वर्गीय संघटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर या शाखेचे शाखा अध्यक्ष श्री. बुद्धशिल बहादे, उपाध्यक्ष श्री भगवान शिंदे व श्री संतोष बावणे, महिला अध्यक्ष श्रीमती मंजू महातव, महिला उपाध्यक्ष श्रीमती सुलोचना जाधव, कोषाध्यक्ष श्री राजेश हेमने, सचिव श्री निलेश ठाकरे, संघटनेचे मार्गदर्शक श्री विनोद निशिबकर, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप देशट्टीवार व दत्ता ठाकरे तसेच संस्था स्तरावरील सर्व लिपिक वर्गीय यांची प्रामुख्याने निवेदन देते वेळेस उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या