बल्लारपूर :- बल्लारपूर नगर परिषद निवडणूक 2025 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 1 व नगरसेवक साठी 34 नामांकन दाखल झाली होती. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आज 17 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवक पदासाठी 176 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्याची वृत्त प्राप्त होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 10 अर्ज ज्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष साठी सौ. रेणुका सुधाकर दुधे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष साठी सौ. अल्का अनिल वाढई, बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सौ. पूजा अमर रहिकवार, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्योत्स्ना दिपक वाळके, आरपीआय तर्फे वंदना पंचशील तामगाडगे, शिवसेना(उबाठा) तर्फे चैताली दिपक मुलचंदानी, रोजिदा ताजुद्दिन शेख (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), मंजुषा अय्यर (आप), मीनाक्षी कुल्दीवार(अपक्ष) ई उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. तर नगरसेवक पदासाठी 210 उमेदवारांनी विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून नामांकन अर्ज दाखल केल्याची माहिती प्राप्त होत आहे. भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विविध राजकीय पक्ष व अपक्ष यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अल्का वाढई यांना देण्यात आल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी यांची सून चैताली मुलचंदानी यांनी उबाठाची मशाल हाती घेत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील कुल्दीवार यांच्या पत्नी मीनाक्षी कुलदीवार यांनीही बंडखोरी करीत नगराध्यक्ष पदाकरिता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला. उद्या उमेदवारी अर्जाच्या छाननी नंतर किती अर्ज बाद होतात व किती उमेदवार आपली उमेदवारी परत घेतात यावर राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले आहे एकूणच बल्लारपूर शहरात राजकीय चर्चाना उधाण आले असून आपण किती चांगले आहोत ही बाब मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या माध्यमातून बल्लारपूर शहरात होत आहे. (सविस्तर वृत्त अल्पावधीत...)
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या