चंद्रपूरचा बदला भिवंडीत ? भाजपच्या बंडखोरासोबत काँग्रेस भिवंडीत सत्तेत, भाजपची 6 मते फुटली (Chandrapur's revenge in Bhiwandi? Congress in power in Bhiwandi with BJP rebel, BJP loses 6 votes)
वृत्तसेवा :- भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण घेतले आहे. भाजपने उमेदवारी घोषित केल्यानंतरही पक्षात फूट पडल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांनी आता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सेक्युलर फ्रंट स्थापन केला आहे. या आघाडीकडे सध्या ५१ नगरसेवकांचे संख्याबळ असून, महापौरपदासाठी आवश्यक असलेल्या ४६ च्या बहुमताचा आकडा त्यांनी सहज ओलांडला आहे. या घडामोडीमुळे काँग्रेसला एकाच वेळी दोन फायदे मिळण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासोबतच, त्यांचा स्वतःचा महापौरही निवडून येण्याची शक्यता बळावली आहे. भिवंडी महापालिकेत ९० नगरसेवक असून, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सर्वाधिक ३० नगरसेवक काँग्रेसचे आहेत, तर राष्ट्रवादीचे १२ आहेत. भाजपमधून फुटलेल्या नारायण चौधरींच्या नऊ नगरसेवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने सेक्युलर फ्रंट मजबूत झाला आहे. या निमित्ताने काँग्रेसने चंद्रपूरमध्ये भाजपने साधलेल्या यशाचा वचपा भिवंडीत काढण्याची रणनीती आखल्याचे दिसते.
भिवंडी महापालिकेच्या स्व. विलासराव देशमुख सभागृहात महापौर आणि उप महापौर पदाची निवडणूक पार पडली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले. पांचाळ यांनी निवडणूकिसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आणि अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. नारायण चौधरी यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज त्यांनी मागे घेतला. त्यांच्यासह तारीक मोमीन जावेद दळवी, सुचिता म्हात्रे, बाळाराम चौधरी, मयुरेश पाटील आणि प्रतिभा पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर विलास पाटील, भाजपच्या स्नेहा पाटील, आणि नारायण चौधरी यांच्यात तिरंगी लढत झाली. अखेरच्या टप्प्यात विलास पाटील (२५ मते), भाजपच्या स्नेहा पाटील (१६ मते) आणि नारायण चौधरी (४८ मते) अशी मते मिळाली. मतदानानंतर नारायण चौधरी यांनी स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला. मतदानात भाजपमधील फूट निर्णायक ठरली आणि नारायण चौधरी यांनी महापौरपदावर झेंडा फडकावला. एका गुन्ह्यात अटकेत असलेले विलास पाटील यांना पोलिस कोर्टाच्या आदेशाने सभागृहात घेऊन येत होते. परंतु, ते रस्त्यात वाहतूक कोंडीत अडकल्याने उशिरा पोहोचत असल्याने तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबावी अशी मागणी नगरसेवक मयुरेश पाटील यांनी केली. तर, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी ठरलेल्या वेळेत निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याची मागणी केली. अखेर पीठासीन अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवडणूक कार्यक्रम नियोजित वेळेनुसार सुरू केला. त्याचदरम्यान मतदानापूर्वीच विलास पाटील सभागृहात दाखल झाले
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या