Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपसोबत युतीः महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर, काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव (Thackeray's Shiv Sena alliance with BJP in Chandrapur Municipal Corporation: BJP's Sangeeta Khandekar for Mayor, Congress defeated by just one vote)

चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपसोबत युतीः महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर, काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव (Thackeray's Shiv Sena alliance with BJP in Chandrapur Municipal Corporation: BJP's Sangeeta Khandekar for Mayor, Congress defeated by just one vote)

उपमहापौर पदी ईश्वरचिट्ठीने प्रशांत दानव यांची निवड दोन्ही उमेदवारांना 32-32 समान मते

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा मंगळवारी अत्यंत नाट्यमय शेवट झाला. "कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा," असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची चर्चा सकाळी सुरू असतानाच, दुपारी मात्र ठाकरे गटाने चक्क भाजपशी हातमिळवणी करत सर्वांनाच धक्का दिला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत फिस्कटलेले गणित आणि भाजपने दिलेली महापौरपदाची 'ऑफर' यामुळे चंद्रपुरात नवे राजकीय समीकरण आकारास आले आहे. दरम्यान, आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक पार पडली. भाजपच्या संगीता खांडेकर आणि काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांच्या लढत होती. या चुरशीच्या लढतील निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांचा विजय झाला. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना ३१ मते पडली. तर संगीता खांडेकर यांना ३२ मत मिळाली. संगीता खांडेकर यांची अवघ्या मताने महापौरपदी वर्णी लागली आहे. मतदानावेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक हे गैरहजर राहिले होते. तर एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने निकालावर निर्णायक परिणाम झाला. वडेट्टीवार-गि-हेंची बैठक निष्फळ आज सकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिहे यांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाने महापौरपदाची मागणी केली होती, मात्र वडेट्टीवार पाच वर्षांच्या कार्यकाळात एकदाही महापौरपद देण्यास तयार नव्हते. यामुळे संतापलेले संदीप गिहे बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आणि ठाकरे गटामध्ये चंद्रूपर महापालिकेचे महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांच्या प्रत्येकी दोन टर्ममध्ये वाटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे पाच वर्षे उपमहापौर असतील. तर स्थायी समिती ही पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ठाकरे गटाला देण्यात आली आहे. यानंतरच भाजपला ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचे जाहीर करण्यात आले. मी आज सकाळीदेखील विजय वडेट्टीवारांच्या कार्यालयात गेलो होते, महापौरपदाबाबत विनंती केली. पण ते आम्हाला पाच वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते, असा आरोप उबाठाचे संदीप गिऱ्हे केला. त्यामुळे विकासाला चालना देण्यासाठी आम्ही भाजपसोबत बोलणी केली, असे संदीप गिऱ्हे स्पष्टपणे सांगितले.
           तर चंद्रपूर महापालिकेच्या उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी भाजप सेना युतीकडून अपक्ष उमेदवार प्रशांत दानव आणि काँग्रेस आघाडीचे पप्पू देशमुख यांच्यात लढत झाली. महापौरपद केवळ एका मताने गमावल्यानंतर आता उपमहापौर पदाची निवडणूक कशी होते, MIM सदस्य यात सहभागी होतो का नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पण उपमहापौरपदासाठी दोन्ही उमेदवारांनी सारखीच मते मिळाली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे पप्पू देशमुख आणि भाजप युती उमेदवार प्रशांत दानव यांना समान म्हणजे 32 - 32 मते मिळाली. त्यामुळे आता पीठासन अधिकारी ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेतला. ठाकरे सेनेचे प्रशांत दानव ईश्वर चिठ्ठीद्वारे उपमहापौरपदी निवड झाली. 
         ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या होत्या. इथं काँग्रेस आणि शेकापनं एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे शेकापच्या ३ नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा होता. अशात काँग्रेसला स्वत:चा महापौर करण्यासाठी अवघ्या ४ नगरसेवकांची गरज होती. अशात इथं ठाकरे गटाचे सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे ठाकरे गटाला सोबत घेतलं तर बहुमताचा आकडा सहज क्रॉस होत होता. पण ठाकरे गट आणि वंचितने स्वतंत्र गट स्थापन करत महापौर पदाची मागणी केली. जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, अशी थेट भूमिका ठाकरे गटाने घेतली. काँग्रेसमधील याच अंतर्गत वादाचा फायदा भाजपनं घेतला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सत्तेत वाटा देत युती जुळवून आणली. ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा देताच बहुमताचा आकडा भाजपच्या बाजुने झुकला. ठाकरेंनी पाठिंबा दिला असला तरी भाजप अद्याप बहुमतापासून दूर होतं. अशात एमआयएम आणि वंचितने भाजपला पडद्याआडून मदत केली. वंचितचे दोन नगरसेवक महापौरपदाच्या निवडीला गैरहजर राहिले. तर एमआयएमचा नगरसेवक तटस्थ राहिला. अशा स्थितीत बहुमताचा आकडा ३४ वरुन ३२ वर आला. परिणामी भाजपच्या संगीता खांडेकर एका मताने विजयी झाल्या. त्यांना ३२ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३१ मतं मिळाली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या