Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूर जिल्ह्याकरिता स्थानिक सुट्टया जाहीर (Local holidays declared for Chandrapur district)

चंद्रपूर जिल्ह्याकरिता स्थानिक सुट्टया जाहीर (Local holidays declared for Chandrapur district)


चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या राजकीय सेवा विभागाच्या 16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णय क्रमांक पी -13-II-B तसेच दि. 6 ऑगस्ट 1958 च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी 2026 करिता स्थानिक सुट्टी जाहीर केल्या असून त्यांनी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार दि. 11 सप्टेंबर 2026 शुक्रवारला, तान्हापोळा, 16 ऑक्टोबर 2026 शुक्रवारला धम्मचक्र अनुवर्तन दिन, 9 नोव्हेंबर 2026 सोमवार नरक चतुर्दशी(दिवाळीचा दुसरा दिवस), याप्रमाणे स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्या असून या सुट्टया चंद्रपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौंजदारी न्यायालय व बँक यांना लागू राहणार नाही सदर सुट्टी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरिता लागू राहील असेही पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे 2025 या वर्षात 16 ऑक्टोबर धम्मचक्र अनुवर्तन दिनाची स्थानिक सुट्टी वेळेवर जाहीर करण्यात आल्याची माहिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या