Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक ! नागपूर जवळ काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी असल्याची माहिती (Shocking ! Major explosion in an ammunition company in Katol near Nagpur; 17 workers killed, many injured)

धक्कादायक ! नागपूर जवळ काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी असल्याची माहिती (Shocking ! Major explosion in an ammunition company in Katol near Nagpur; 17 workers killed, many injured)

मृतकाच्या कुटुंबियांना कंपनी तर्फे 75 लाख तर जखमीना 25 लाखाची मदतीची घोषणा 

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL बारूद कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राऊळगाव येथील SBL कंपनीत सकाळी सुमारे ७ वाजून १० मिनिटांनी पहिला स्फोट झाला. कंपनीमध्ये स्फोटके (बारूद) तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन त्यानंतर आग लागल्याचे सांगितले जात आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे आणि आत अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 
             या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार आसपासच्या गावांतील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊळगाव परिसर हा जंगलाचा परिसर असल्याने इथे अनेक स्फोटकं बनवणाऱ्या खासगी कंपन्या आहेत. हा बफर झोन असल्याने येथे फारशी वस्ती नाही. यासंदर्भात बोलताना, नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. 'पेसो' आणि 'डिश' यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आसपासच्या गावांतील नागरिक या कंपन्यांमध्ये काम करतात. स्फोटाचे मोठे आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमले असून या घटनेबाबत स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही प्रत्यक्षदर्शींनी पहिल्या स्फोटानंतर आणखी स्फोट झाल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे. 
           या संदर्भात काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील SBL Energy Limited मध्ये झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी आज विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ७५ लाख रुपये कंपनी तर्फे अणि राज्य सरकार तर्फे 5 व केंद्र सरकार कडून 2 लाख, तसेच जखमींना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही आर्थिक मदत जीवाची भरपाई करू शकत नाही, याची जाणीव सर्वांना आहे; मात्र मृतक व जखमींच्या कुटुंबियांवर अचानक ओढवलेल्या आर्थिक संकटाचा काही अंशी भार कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. तसेच, या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी जबाबदारी निश्चित करून कठोर उपाययोजना राबविण्याचीही मागणी करण्यात आली. बैठकीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशीष जैस्वाल, आमदार चरणसिंह ठाकूर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपिन ईटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार जी, सलिल देशमुख उपस्थित होते.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या