रंगपंचमीच्या दिवशी किल्ला वॉर्ड परिसरात गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल (A case has been registered against seven people for disturbing public peace by creating a ruckus in the Killa ward area on the day of Rang Panchami.)

Vidyanshnewslive
By -
0
रंगपंचमीच्या दिवशी किल्ला वॉर्ड परिसरात गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल (A case has been registered against seven people for disturbing public peace by creating a ruckus in the Killa ward area on the day of Rang Panchami.)

बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड हे सुमारे ४ वाजताच्या सुमारास मौजा विसापूर येथे बंदोबस्तासाठी जात असताना किल्ला वॉर्डातील भगतसिंग दूध डेअरीजवळील चौकात काही युवकांमध्ये वाद सुरू असल्याचे आढळले. संबंधित इसम हे रस्त्यावर एकमेकांना हाताबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करीत होते. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी गस्त घालत असताना किल्ला वॉर्ड परिसरात सार्वजनिक ठिकाणी मारहाण व गोंधळ घालणाऱ्या सात जणांविरुद्ध ३ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
            या संदर्भातील अधिक माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर सातही जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले चौकशीत त्यांची नावे आदित्य रमेश मेश्राम (वय २८), प्रतीश विठ्ठल चालखुरे (वय ३४), हर्षल भारत खैरकर (वय २५), नितीन अशोक देशकर (वय ३३), प्रितम संतोष सातपुते (वय ३६), सिमरण सुरेश खोब्रागडे (वय २७, सर्व रा. किल्ला वॉर्ड, बल्लारपूर) व तनु प्रभुदास वासेकर (वय २५, रा. गोकुलनगर वॉर्ड, बल्लारपूर अशी असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात पैशांच्या मागणीच्या कारणावरून दोन गटांमध्ये हा वाद झाल्याचे समोर आले असल्याची माहिती प्राप्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी सातही जणांविरुद्ध कलम १९४(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)