चंद्रपूरात वाढता मानव-वन्य जीव संघर्ष चिंतेचा विषय २०२५ मध्ये मानव वन्यप्राणी संघर्षात ४९, तर २०२६ मध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ६ नागरिकांचा जीव गेला. (Increasing human-wildlife conflict in Chandrapur is a matter of concern. In 2025, 49 citizens lost their lives in human-wildlife conflict, and in January-February 2026, 6 citizens lost their lives.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात वाढता मानव-वन्य जीव संघर्ष चिंतेचा विषय २०२५ मध्ये मानव वन्यप्राणी संघर्षात ४९, तर २०२६ मध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ६ नागरिकांचा जीव गेला. (Increasing human-wildlife conflict in Chandrapur is a matter of concern. In 2025, 49 citizens lost their lives in human-wildlife conflict, and in January-February 2026, 6 citizens lost their lives.)

चंद्रपूर :- देशात वाघांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील अर्धे म्हणजेच ३०० च्या जवळपास वाघ आहेत. जिल्ह्यात असलेली वाघांची संख्या पाहता पाहिजे त्या प्रमाणात जंगले वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित राहिलेली नसल्याने वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस मानववस्तीकडे वाढत आहे. वाघांसह बिबट, हरीण, रानडुक्कर, चितळ, नीलगाय, रानगवे अशा अनेक प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या वन्यप्राण्यांच्या संख्येसह जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी पडत असल्याने मानव वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा शिरकाव होत असून त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे. परिणामी वाढत्या मानव वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी प्रशासनामार्फत पाहीजे त्या प्रमाणात ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परिणामी मानव-वन्यप्राणी संघर्षात वाढ झाल्याने वन्यप्राण्यांसह मानवी जीवन संकटात सापडलेले आहे. यावर शासनाकडून शाश्वत उपायोजनांची आवश्यकता निर्माण झालेली आहे. जिल्ह्याला नैसर्गिक वनसंपन्नतेचा वरदान मिळालेला असून त्यामुळे लाभलेली वन्यप्राणी ही जिल्ह्यातील मौलिक संपत्ती आहे. मात्र देशात वाघाच्या संवर्धनासाठी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात एकूण ४८४५.३० चौ.कि.मी. म्हणजे एकूण भौगालिक क्षेत्राच्या ४२.३४ टक्के वनक्षेत्र आहे. जिल्ह्यात जगातील वाघांच्या संख्येच्या ५ टक्के म्हणजेच ३०० च्या जवळपास वाघ आहेत. 
         जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र पकल्प हा वाघांच्या संवर्धनासाठी विकसीत करण्यात आला. यात पर्यटकांची संख्या वाढविण्याकडे लक्ष देण्यात आले. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेला मानव वन्यजीव संघर्ष, वन्यप्राण्यांचे मानववस्तीकढे होत असलेले स्थलांतर, वनांमध्ये होत असलेले अतिक्रमण, ताडोबा प्रकल्पात पर्यटनाच्या नावावर होत असलेल्या रिसॉर्टचे बांधकाम, वनात वाढत असलेला मानवी हस्तक्षेप अशा गोष्टींकडे वनविभागाने पाहिजे त्या प्रमाणात लक्ष न दिल्याने वन्यजीव संकटात सापडलेले आहेत. वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी मानवस्तीकडे येत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झालेले आहे. परिणामी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवांचा बळी जाणे, वन्यप्राण्यांचा मृत्यू होणे अशा घटना नियमित झालेल्या आहेत. त्यामुळे वन्यजीव असलेल्या जिल्ह्यात वन्यप्राण्यांसह मानवजीवनही संकटात सापडलेले आहे. २०२५ या वर्षामध्ये मानव वन्यप्राणी संघर्षात एकूण ४९ नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. तर गत ५ वर्षामध्ये २०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. २०२६ वर्षातील जानेवारी फेब्रवारी महिन्यात ६ नागरिकांचा जीव गेला. तर २०२५ मध्ये १२ वाघ आणि ५ बिबटांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक वन्यप्राण्यांचा जीव गेलेला आहे. दिवसेंदिवस मानवासह वन्यप्राण्यांची मृत्यूची संख्याही वाढत आहे. बल्लारशा गोंदिया हा रेल्वेमार्ग दक्षिण विदर्भातील वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. गतवर्षभरात रेल्वेच्या धडकेत अनेक वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. यात वाघांसह रानगवा, अस्वल, सांबर, चितळ या प्राण्यांच्या समावेश आहे. या मार्गावर वन्यजीवांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. दक्षिणेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्य यांना जोडणाऱ्या व्याघ्रभ्रमण मार्गाला छेदून जातो. तर उत्तरेला ब्रह्मपुरी जोडणऱ्या भ्रमण मार्गाला छेदतो. त्यामुळे रेल्वेमार्गामुळेही वन्यजीव संकटात सापडलेले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)