Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटपाचे आयोजन संपन्न. (Sunrise Multipurpose Organization's commendable initiative, blood donation camp and fruit distribution to patients, was successfully completed.)

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटपाचे आयोजन संपन्न. (Sunrise Multipurpose Organization's commendable initiative, blood donation camp and fruit distribution to patients, was successfully completed.)


मूल :- २ मार्च २०२६ ला सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन मूल चे सदस्य स्व. यश सुनील मोहुर्ले यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन मूल च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय मूल येथे रक्तदान शिबिराचे व रुग्णांना फळ वाटपाचे आयोजन करण्यात आले . त्यावेळी स्व. यश सुनील मोहुर्ले यांच्या प्रतिमेला वनिता ऋषीजी रस्से (आजी) व उपजिल्हा रुग्णालय मूल येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बंडू रामटेके आणि उपजिल्हा रुग्णालय मूल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरथ पी. उराडे यांच्या हस्ते माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. तसेच अनंता रस्से (मामा) व मुकुंदा रस्से ( मामा) व उपस्थित नातेवाईक व मित्र परिवारांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यामध्ये ४४ रक्तदात्यांनी रक्त देऊन यश सुनील मोहुर्ले यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन मूल चे अध्यक्ष तन्मय तिरथ उराडे, ऑर्गनायझेशन चे उपाध्यक्ष अंकुश सुनील वाणी, ऑर्गनायझेशन चे सचिव संकल्प मनोहर गणवीर, ऑर्गनायझेशन चे सहसचिव जय पुरुषोत्तम मोहुर्ले, ऑर्गनायझेशन चे कोषाध्यक्ष प्रतिक अनंत लेनगुरे, ऑर्गनायझेशन चे सदस्य भैरवी संतोष सहारे, सदस्य दिशा मदन शेंडे, सदस्य ओमकार विलास शेंडे, सदस्य शिव विलास शेंडे आदी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या