बल्लारपूरातील बिटीएस प्लॉट चौकात भिषण अपघात, ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू तर पती जखमी (A horrific accident occurred at the BTS Plot square in Ballarpur; a woman died and her husband was injured in a collision with a truck.)
बल्लारपूर :- गोंडपिपरीहून चंद्रपूरकडे मोपेडने जात असताना बल्लारपूर शहरातील बीटीएस चौकात भीषण अपघात घडला. या संदर्भात सूत्रांच्या माहितीनुसार 5 फरवरी ला दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान सदर अपघात घडला या अपघातात सौ. निलिमा देवराव रोहनकर (३८), रा. छोटा बाजार वॉर्ड, चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती देवराव रोहनकर हे अपघातात जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, रोहनकर दाम्पत्य मोपेड गाडी क्रं एमएच ३४ सीपी २४१७ ने गोंडपिपरी ते चंद्रपूर कडे प्रवास करत असताना ओव्हरटेक करत असलेल्या ट्रकने धडक दिली. धडकेनंतर ट्रकचे मागील चाक निलिमा रोहनकर यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अपघातात पती उसळून बाजूला पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. संबंधित ट्रक क्रं एमएच ३३ टी ३८३६ लोहखनिज घेऊन घुग्गुसकडे जात असल्याचे सांगितले जाते.
मृत निलिमा रोहनकर व त्यांचे पती काल गोंडपिपरी तालुक्यातील जयरामपूर येथे घराच्या वास्तुसाठी गेले होते. त्यांच्या पश्चात २१, १८ व १६ वर्षांच्या तीन मुली आहेत. मोठ्या मुलीचा मागील महिन्यात साक्षगंध पार पडला असून तिचा विवाह येत्या ७ मे रोजी होणार आहे. या दुर्घटनेमुळे रोहनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे व पोलीस हवालदार यशवंत कुमरे करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या