बल्लारपूरातील गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात भारतीय सैन्य दिन उत्साहात साजरा (Indian Army Day was celebrated with enthusiasm at Guru Nanak Science College in Ballarpur.)
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट योगेश टेकाडे यांचे भू-राजकारण व भारतीय सशस्त्र दलांवर प्रेरणादायी मार्गदर्शन
बल्लारपूर :- बल्लारपूर येथील गुरु नानक विज्ञान महाविद्यालयात भारतीय सैन्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरचे असोसिएट एनसीसी अधिकारी लेफ्टनंट योगेश टेकाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी भू-राजकारण व भारतीय सशस्त्र दलांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम गुरु नानक विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूरचे प्राचार्य डॉ. बी. एम. बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात ४५ एनसीसी कॅडेट्सनी सक्रिय सहभाग घेतला. कॅप्टन डॉ. महेश चंद शर्मा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या