चंद्रपूरातलं राजकारण तापलं ! भाजप उमेदवार अन् बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी ; तर नेहरू विद्यालय परिसरातील प्रलोभनातून राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यात राडा...! (The political atmosphere in Chandrapur has heated up! A fierce brawl broke out between the supporters of the BJP candidate and the rebel candidate; and a clash also occurred between political party workers near Nehru Vidyalaya due to alleged inducements...!)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूर महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर मतदानाची रणधुमाळी होत आहे. मतदानाला सकाळपासून संमिश्र प्रतिसाद आहे. अशातच शहरातील बंगाली कॅम्प परिसरात काल (14 जानेवारी ) रात्री भाजप उमेदवार रॉबिन विश्वास आणि अपक्ष असलेले भाजप बंडखोर उमेदवार अजय सरकार यांच्या कार्यकर्त्यां मध्ये तुंबळ मारामारी ची घटना घडलीय . अजय सरकार यांनी रॉबिन विश्वास समर्थक असलेल्या अनु हाजरा या महिलेला मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप केलाय. तर रॉबिन विश्वास यांनी अजय सरकार समर्थक असलेल्या ज्योती सरकार यांचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप केलाय. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अजय सरकार आणि रॉबिन विश्वास या दोघांवरही विनयभंग, मारहाण करणे आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केलाआहे. आज पहाटे दोन्ही पक्षांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अजय सरकार आणि रॉबिन विश्वास यांच्यात बंगाली कॅम्प प्रभागातून एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. अशातच निकालापूर्वी चंद्रपुरातील राजकारण तापलं आहे. 
           चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक मतदाना दरम्यान शहरातील नेहरू शाळा मतदान केंद्राच्या परिसरात शिवसेना शिंदे गट आणि भाजप बंडखोर उमेदवारांच्या समर्थकांत मतदारांना प्रलोभनावरून राडा झाल्याचे समोर आलं आहे. दरम्यान जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. यावेळी दोन्ही गटांने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातलाय. याठिकाणी शिवसेना शिंदे गटातर्फे इसमत हुसेन तर भाजप बंडखोर उमेदवार दीपा कासट मैदानात आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले आहेत. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)