जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन लोगोचे लोकार्पण (Unveiling of the new logo of the District Health Officer's Office)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन लोगोचे लोकार्पण (Unveiling of the new logo of the District Health Officer's Office)

चंद्रपूर :- जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने आज नवीन अधिकृत लोगोचे लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कार्यालयातील तांत्रिक व आस्थापना विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेत, उत्तरदायित्वात आणि नागरिकाभिमुख सेवेत सातत्याने होत असलेल्या सुधारणा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा नवीन लोगो विभागाच्या ओळखीला नवी दिशा देणारा ठरेल, असे मत डॉ. अशोक कटारे, यांनी व्यक्त केले. नवीन लोगोमुळे जिल्हा आरोग्य विभागाची एक वेगळी ओळख निर्माण होउन यामुळे विभागाची कार्यसंस्कृती, दृष्टीकोन आणि जनतेशी असलेली बांधिलकी अधिक स्पष्टपणे दृश्यमान होईल. या उपक्रमामुळे विभागाची प्रतिमा अधिक बळकट होईल, असा विश्वास विभागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)