नागपूर :- महाराष्ट्रात 246 नगर परिषदेच्या व 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होत असून त्यापैकी राज्यात 264 नगर परिषद व नगरपंचायतीच्या साठी आज 2 डिसेंबर रोजी सर्वत्र मतदान जरी होत असले तरी राज्यातील नागरिकांना मतमोजणीसाठी 21 डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे दरम्यानच्या काळात एक्सिट पोल सुद्धा प्रदर्शीत करण्यात येणार नाही विशेष म्हणजे आज सकाळी 11:00 वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात या निवडणुका संदर्भात सुनावणी झाली व त्यावर निकाल देतांना राज्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी एकत्रित रित्या 21 डिसेंबरला पार पडतील या दरम्यानच्या काळात आज जरी राज्यात निवडणुका होत असल्या तरी निवडणूक कार्यक्रम पूर्ण होई पर्यंत राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू राहील असेही न्यायालयाने निकाल देतांना स्पष्ट केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या