धक्कादायक ! राजुऱ्यात हत्येचा थरार, पतीला पत्नी व तिच्या प्रियकराने ठार केल्याची घटना (Shocking ! Murder thriller in Rajura, husband killed by wife and her lover)
राजुरा :- पत्नीला नेण्यासाठी चंद्रपुरात आलेल्या पतीला पत्नी व तिच्या प्रियकराने ठार केल्याची घटना ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता राजुरा तालुक्यातील हरदोना गावात घडली, पोलिसांनी या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० वर्षीय राजेश नारायणलाल मेघवंशी राहणार भिलवाडा राजस्थान असे मृतकाचे नाव आहे. राजुरा तालुक्यातील हरदोना गावात ब्लास्टिंग च्या कामासाठी विविध राज्यातील अनेक कामगार या ठिकाणी राहतात. मागील वर्षी राजेश मेघवंशी व त्याची पत्नी दुर्गा उर्फ जिया काम करण्यासाठी हरदोना मध्ये आले होते. काही महिन्यांनी राजेश आपल्या पत्नीसह राजस्थान मध्ये आपल्या गावी परतले, हरदोना मध्ये काम करतेवेळी चंद्रप्रकाश मेघवंशी सोबत जायचे प्रेमसंबंध जुळले होते. विशेष म्हणजे चंद्रप्रकाश हा राजस्थान राज्यातील भिलवाडा गावात राहणारा असून तो मृतकाच्या पत्नीचा नात्यात भाऊ लागत होता.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या