बल्लारपूर :- काँग्रेस पक्षाने नगरपरिषद निवडणुकीसाठी अध्यक्षपदासह ३२ वार्ड साठी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध कृती करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष नगरपरिषद निवडणुकीत बहुमत मिळवेल आणि अध्यक्षांसह २० हून अधिक नगरसेवक निवडून येनार. शहर काँग्रेस कमेटीच्या सर्व शाखांचे (महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवा दल आणि इंटक) सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्यासाठी दिवसरात्र अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येईल आणि बल्लारपूर नगरपरिषदेत काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा एकदा उंच फडकेल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या