भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातील बाबासाहेबांचे पुतळे स्वच्छ करण्याचे शासन परिपत्रक जाहीर (Government circular issued to clean statues of Babasaheb Ambedkar across the state on the occasion of the 69th Mahaparinirvana Day of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar)
मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी, फुलांची सजावट व हारांची व्यवस्था करण्याबाबत आदेश/परिपत्रक काढणेबाबत. श्री. रमेश मारुती जाधव, कामगार नेते/चैत्यभूमी व्यवस्थापक, श्रमिक भारतीय यूनियन यांचे दिनांक १०.११.२०२५ चे पत्र. उपरोक्त संदर्भाकित निवेदनांचे कृपया अवलोकन करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी, फुलांची सजावट व हारांची व्यवस्था करण्याबाबत आदेश/परिपत्रक काढणेबाबत उपरोक्त पत्रान्वये विनंती केली आहे. (प्रत संलग्न) उपरोक्त विनंतीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती ह्या अनुक्रमे नगर विकास विभाग व ग्राम विकास विभागांतर्गत कार्यरत आहेत. सबब, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसरात ६ डिसेंबरपूर्वी स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी, फुलांची सजावट तसेच हारांची व्यवस्था करण्याबाबत आदेश/परिपत्रक काढणेबाबत आपल्या स्तरावरून पुढील उचित कार्यवाही करावी,
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या